शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एमएसआरडीसीने थकविले पालिकेचे खड्डे बुजविण्याचे ६२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:13 IST

ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची यंदा पावसाने पार वाताहत झाली आहे. मात्र, एमएसआरडीसी आणि शासनाच्या मालकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे ...

ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची यंदा पावसाने पार वाताहत झाली आहे. मात्र, एमएसआरडीसी आणि शासनाच्या मालकीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत ठाणे महापालिकेने कानाला खडा लावला आहे. गेल्यावर्षी अशा पद्धतीने या प्राधिकरणाच्या मालकीच्या रस्त्यांना खड्डे पडले होते. यासाठी पालिकेच्या तिजोरीवर ६२ लाखांचा भुर्दंड पडला होता. हा खर्च परत मिळावा म्हणून, पालिकेने एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांनी हा खर्च देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा खर्च वसूल कसा करायचा, असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला आहे.यंदा ठाण्यातील मागील १० वर्षांतील रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. त्यामुळे शहरातील नव्या आणि जुन्या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध हालचाली सुरू आहेत. परंतु, पावसाची उघडीप मिळत नसल्याने खड्डे बुजवण्याच्या कार्यात अडथळे येत आहेत. त्यात या खड्ड्यांच्या मुद्यांवरून शिवसेना आणि भाजपकडून राजकीय भांडवल केले जात आहे. असे असले तरी ठाणेकरांचे मात्र या खड्ड्यांमुळे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. आजही शहरातील तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी आदींसह शहरातील इतर भागातही खड्डे पडले आहेत. पालिकेने नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत.दरम्यान, पालिकेने त्यांच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहेत. परंतु, इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी असहकार पुकारला आहे. त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. गेल्यावर्षीदेखील शहरातील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यावेळी रस्ते कोणाचेही असोत, त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, खड्डे बुजवण्यात आले होते. त्यानंतर, यासाठी झालेला खर्च संबंधित प्राधिकरणांकडून परत मिळावा, यासाठी पालिकेच्या माध्यमातून एमएसआरडीसीकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, वर्ष उलटूनही त्यांच्याकडून यासाठी झालेला ६२ लाखांचा खर्च पालिकेला मिळू शकलेला नाही. उलट, या प्राधिकरणाकडून तुम्ही आमच्या रस्त्यांवरील खड्डे का बुजवले, असा सवाल उपस्थित करण्यात आला असून हा खर्च देण्यास नकार दिल्याची माहितीही समोर आली आहे.>मागचा कटू अनुभव विचारात घेता, यंदाच्या पावसात शासनाच्या मालकीच्या आणि एमएसआरडीसीच्या मालकीच्या असलेल्या रस्त्यांवरील खड्डे न बुजवण्याचा पवित्रा पालिकेने घेतला आहे. परंतु, लोकांच्या सोयीसाठी हे खड्डे बुजवण्यात यावेत, यासाठी पालिकेने एमएसआरडीसी आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे.

टॅग्स :thaneठाणे