शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मोदी जीवावर उदार होऊन पाकला गेले

By admin | Updated: December 28, 2015 02:36 IST

मराठी साहित्य संमेलन आणि त्याच्या व्यासपीठावरील राजकारण्यांचा वावर, हा नेहमीच वादविषय ठरला असताना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल

मुरलीधर भवार, कल्याणमराठी साहित्य संमेलन आणि त्याच्या व्यासपीठावरील राजकारण्यांचा वावर, हा नेहमीच वादविषय ठरला असताना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीवरून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचा समाचार घेत त्यांच्या मदतीला सरसावले. मोदी हे जीवावर उदार होऊन पाकिस्तानला गेले ते पाहा, असा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला.मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अचानक पाकिस्तानला भेट दिली. ही भेट पूर्वनियोजित होती किंवा कसे, यावरून तसेच ही भेट एका उद्योगपतीच्या विनंतीवरून घेतली गेली किंवा कसे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना सबनीस यांनी या वादात उडी घेतली आहे.सबनीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी भारत-पाक संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानला दिलेल्या भेटीकडे कलुषित नजरेने पाहणे अयोग्य आहे. मोदी जीवावर उदार होऊन पाकिस्तानला गेले. त्या ठिकाणी त्यांच्या जीवास घातपातही होण्याची शक्यता होती. त्यामुळे मोदींची ही भेट विवेकी राष्ट्रवादीचे लक्षण आहे.कल्याण सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या पु.भा. भावे व्याख्यानमालेनिमित्त अध्यक्ष सबनीस कल्याण वाचनालयात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आधीच्या सरकारमधील सिंचन घोटाळा व विद्यमान सरकारमधील चिक्की घोटाळा हे आर्थिक भ्रष्टतेचे भाग असून, जोपर्यंत हे घोटाळे थांबत नाहीत, तोपर्यंत विस्कटलेला सांस्कृतिक नकाशा नीट होणार नाही, अशा शब्दांत सबनीस यांनी सत्ताधारी व विरोधकांना टोले लगावले. देशात असहिष्णुता निर्माण झालेली आहे, याबद्दल वादच नाही. ती मी मान्य करतो. असहिष्णुता धार्मिक स्वरूपाची आहे. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्यादेखील निंदनीय आणि निषेधार्ह आहेत. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करण्याकरिता काही समाज, गट गोडसे यांचे मंदिर उभारणार असतील तर त्याला माझा विरोध आहे. हा भ्रष्ट वैचारिकतेचा दाखला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला गोडसे ब्राह्मण होते म्हणून त्या जातीला दोषी व गुन्हेगार ठरविणे, हेदेखील न्यायाला धरून नाही.