शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा डिजिटलनामा प्रकाशित

By admin | Updated: February 20, 2017 05:55 IST

ठाणे मनसेने एक पाऊल पुढे टाकत आपला जाहीरनामा डिजिटल स्वरूपात ठाणेकरांसमोर आणला आहे. या जाहीरनाम्याचे प्रकाशन

ठाणे : ठाणे मनसेने एक पाऊल पुढे टाकत आपला जाहीरनामा डिजिटल स्वरूपात ठाणेकरांसमोर आणला आहे. या जाहीरनाम्याचे प्रकाशन रविवारच्या पत्रकार परिषदेत झाले. तज्ज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या डिजिटलनाम्यात केवळ आश्वासने नसून त्याचा कृती आराखडादेखील मांडण्यात आल्याचे मनसेचे उपाध्यक्ष अभिजित पानसे व शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.हा डिजिटल वचननामा सोशल मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमांतून प्रत्येक नागरिकांच्या हातात पडावा आणि तो अत्यंत गंभीरपणे नागरिकांनी समजून घ्यावा, यासाठी पारंपरिक जाहीरनामा प्रकाशित करण्याची पद्धत मोडून ठाणे मनसेने तो डिजिटल स्वरूपात मांडला आहे. कचराकुंडीमुक्त नव्हे, डम्ंिपगमुक्त ठाणे शहर, शिक्षणसेतू उपक्रम, सौरशहराची निर्मिती, सायकल स्टॅण्ड, जनशक्ती कट्टे, लाभार्थी योजनेची महासूची, जनसमस्या कक्ष, तलावाचे शहर भागवणार शहराची तहान, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांना या डिजिटलनाम्यात स्थान देण्यात आले आहे. ठाण्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठी ई-लायब्ररी उभी करणार, प्रभागनिहाय शालेय शिक्षण समितीवर त्यात्या प्रभागातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची नियुक्ती करणार, अप्रगत मुलांसाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळेत शालेय वेळेनंतर विशेष शिकवणी वर्ग सुरू करणार, खाजगी वाहतुकीवर नियंत्रण आणणार आणि परिवहन सेवा सक्षम करणार, ठाण्यातील खाजगी शाळांना परिवहन सेवेच्या बसेस सलवतीच्या दरात उपलब्ध करून देणार, प्रत्येक प्रभागात दोन बचत गट बाजार सुरू करणार, वैद्यकीय संघटनांबरोबर करार करून पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करणार, प्रत्येक प्रभागात अत्याधुनिक प्रसूतिगृह व नवजात बालक शुश्रूषा केंद्र उभारणार, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक प्रभागात डे केअर सेंटर उभारणार, महासभेचे स्थानिक वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करणार, प्रत्येक १० किलोमीटरसाठी पार्किंगसाठी वाहनतळ उभारणार, पोलीस आयुक्तालय वाहतूक नियंत्रण कक्षाला साहाय्यभूत ठरेल, अशी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या धर्तीवर वाहतूक नियंत्रण यंत्रणा उभारणार, विकास आराखड्याची अंमलबजावणी करणार, या मुद्द्यांचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)