शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांच्या विकासासाठी मनसेची मुख्यमंत्र्यांकडे धाव, नागपुरात जाऊन घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 10:36 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली असून 27 गावे समाविष्ट केल्यानंतर सरकारने महापालिकेस हद्दवाढ अनुदान देणो अपेक्षित होते.

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली असून 27 गावे समाविष्ट केल्यानंतर सरकारने महापालिकेस हद्दवाढ अनुदान देणो अपेक्षित होते. 700  काेटी रुपये हद्दवाढ अनुदान दिल्यास महापालिकेचे आर्थिक संकट दूर होऊ शकते. हद्दवाढ अनुदानासाठी मनसे मुख्यमंत्र्यांना भेटणार होती असे मनसेने सुतोवाच केले होते. त्यानुसार मनसेच्या पदाधिका-यांनी शनिवारी नागपूरला धाव घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नागपूरात भेट घेऊन मनसेने 27 गावांच्या विकासासाठी किमान एक हजार कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली आहे. 

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते मंदार हळबे आणि जनहित कक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभूदेसाई यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मनसेने आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन त्यांना आर्थिक कोंडी विषयी निवेदन दिले. आर्थिक कोंडी दूर करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे निवेदन स्विकारले आहे. मात्र निधी किती व कधी देणार याविषयी काही एक वाच्यता केलेली नाही. महापालिकेतील अन्य पक्षाचे नगरसेवक महापालिकेत आर्थिक संकट असताना देखील कोलकाता व गंगटोक येथे प्रशिक्षण व पाहणी दौ:यासाठी गेलेले आहेत. मनसेने या दौ-याला विरोध करुन मनसेचे नगरसेवक दौ-याला जाणार नाहीत असे स्पष्ट केले होते. त्यामुळे मनसेने संधी साधत नागपूर गाठले आहे. हद्दवाढ अनुदानाचे स्मरण पत्रे आणि महापौरांकडून यापूर्वी मागणी केलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ अनुदान देता येणार नाही हे यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. त्या ऐवजी 27 गावात एमएमआरडीएच्या माध्यमातून विकास कामे केली जातील असे सांगितले  आहे.

हद्दवाढ अनुदानाची रक्कम 7०० कोटी रुपये असताना मनसेने मध्येच किमान एक हजार कोटी रुपयांचा आकडा कुठून आणला असाही सवाल उपस्थित केला जात असला तरी एक हजार कोटीचे अनुदान मिळाल्यास महापालिकेची आर्थिक तूट एका झटक्यात भरून निघू शकते. तसेच विकास कामांना चालना मिळू शकते. सरकारने मंजूर केलेल्या अमृत योजना, पाणी पुरवठा योजना, स्मार्ट सिटी योजना मार्गी लावण्यास मदत होऊ शकते. मनसेचे काही पदाधिकारी नागपूरला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. तर काही पदाधिका:यांना नागपूर वारीचे काही एक कल्पना नाही. त्यामुळे सोबत न गेलेल्या पदाधिका:यांमध्ये या भेटीविषयी नाराजीचा सूर आहे. याची त्यांनी उघडपणो वाच्यता केलेली नाही.दरम्यान डोंबिवली ते पुणो या मार्गावर खाजगी बसेस चांगला धंदा करतात. सामान्यांकरीता डोंबिवली पुणो बस सेवा सुरु करण्यासाठी मनसेने अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र प्रवासी भार नियमन नसल्याचे कारण पुढे करीत सुरु केलेली बस सेवा अवघ्या एका महिन्यात बंद पडली. डोंबिवली ते पुणो मार्गावर वातानुकूलीत शिवशाही बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या पदाधिका-यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. 

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते मंदार हळबे आणि जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभूदेसाई यांनी नागपूरात काल शुक्रवारी घेतली. डोंबिवली पुणो या मार्गावर खाजगी बसेस सुरु आहेत. त्याला प्रवासी ही आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून बस सुरु केली जात नाही. त्यासाठी मनसेने सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रवासी भार नियमन नसल्याचे कारण पुढे करीत बंद केली. या मार्गावर शिवशाही बस सुरु करावी. वातानुकूलीत सेवेला प्रवाशी चांगला प्रतिसाद देतील. ठाणो जिल्ह्यासाठी सरकारकडून शिवशाहीच्या 14 बसेस प्राप्त झालेल्या होत्या. त्यापैकी बहुतांश बसेस या बोरीवली पुणो मार्गावर चालविण्यात येत आहेत. एकही शिवशाही बस कल्याण, विठ्ठलवाडी, भिवंडी या बस डेपोला मिळाली नाही. डोंबिवली पुणो मार्गासाठी एक शिवशाही बस उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. आत्ता दुस:या टप्प्यात शिवशाही बसेस येतील तेव्हा उपलब्ध करुन देण्यात येतील असे आश्वासन रावते यांनी दिले आहे.

शिवशाही बसेसच्या मागणीसह कल्याण आरटीओ कार्यालयाची जागा अपुरी आहे. कल्याण आरटीओ कार्यालयासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. गेल्या पाच वर्षापासून आरटीओ कार्यालयाचे घोंगडे भिजत पडलेले आहे. वाहन चालकांसाठी नोंदणी करण्याकरीता व आरटीओ कार्यालयाती कर्मचारी वर्गाकरीता जुने कार्यालय गैरसोयीचे आहे. हे कार्यालय नव्याने बांधण्यास तातडीने मंजूरी द्यावी अशी मागणी मनसेने रावते यांच्याकडे केली आहे. एसटी महामंडळाच्या अर्थ संकल्पात त्यासाठी तरतूद केली होती. मात्र ऐनवेळी त्यात 3क् टक्के कपात करावी लागली. त्यामुळे पुढील वर्षाच्या बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करुन हा विषयय मार्गी लावण्याचे आश्वासन रावते यांनी मनसेच्या शिष्टमंडळास दिले आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली