शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सेनेला विरोधासाठी मनसे-भाजपा युती?

By admin | Updated: October 21, 2016 04:26 IST

शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढत मनसेने जोरदार मोहीम उघडायची आणि त्या लाटेवर भाजपाने स्वार व्हायचे, ही कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत

- मुरलीधर भवार,  कल्याण

शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढत मनसेने जोरदार मोहीम उघडायची आणि त्या लाटेवर भाजपाने स्वार व्हायचे, ही कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत राबवलेली रणनीतीच ठाणे आणि उल्हासनगर पालिकांत पुन्हा पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या राजकारणात मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. शिवसेनेसोबत गेल्यास मनसेच्या राजकारणाचा पायाच ढासळतो. त्यामुळे सध्याच्या स्थितीत थेट भाजपासोबत जायचे किंवा त्यांच्यासोबतीने राजकारण करायचे, यावर पक्षात खलबते सुरू आहेत. मात्र त्याबाबत बोलण्यास नेते तयार नाहीत. आधीच्या लोकसभा, विधानसभा, केडीएमसीत मनसेचा आलेख घसरता आहे. मुंबईत मनसेने भाजपालाही टार्गेट केले असले, तरी शिवसेनेच्या कारभाराविरोधात त्यांनी मोहीम उघडली आहे. त्यामुळे मनसेचे येथील टार्गेटही शिवसेनाच असेल. उल्हासनगरला मागील निवडणुकीत मनसेचा एक नगरसेवक निवडून आला होता, तोही भाजपामध्ये गेला. सध्या पाटी कोरी आहे. ठाण्यात सात नगरसेवक असले, तरी फाटाफुटीचे ग्रहण आहे. एकूणच मनसेची परिस्थिती बरी नाही. त्यामुळे संख्याबळ वाढवण्यासाठी युती करणे किंवा कोणत्या तरी पक्षासोबत जाणे, हेच पर्याय पक्षापुढे आहेत. भाजपावर दबावाचे प्रयत्न उल्हासनगरच्या राजकारणात पाय रोवायचे असतील, तर कोणासोबत तरी जाण्याची मनसेची तयारी आहे, हे दाखवून देण्यासाठी आणि भाजपावर दबावासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी ओमी कलानी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. कलानींच्या प्रवेशावरून भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत हाणामारीची वेळ आली आहे. भाजपा, ओमी टीम आणि मनसे असे एकत्र येत निवडणुकीला सामोरे जायचे किंवा ओमी जर भाजपात गेले, तर भाजपा-मनसे असे एकत्र येत निवडणूक लढवायची, असा विचार पक्षात सुरू आहे. भाजपा-ओमी यांनी सिंधीभाषक अमराठी मतांवर लक्ष द्यायचे आणि मनसेने शिवसेनेच्या मराठी मतांना धक्का द्यायचा, अशी ही व्यूहरचना असल्याचे समजते.