शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएच अपघातास जबाबदार?

By admin | Updated: September 25, 2015 02:20 IST

वर्षभरापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि त्याची योग्य ती दुरुस्ती न केल्याने झालेल्या अपघातात रिटा प्रसाद

अंबरनाथ : वर्षभरापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि त्याची योग्य ती दुरुस्ती न केल्याने झालेल्या अपघातात रिटा प्रसाद या महिलेच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालविणाऱ्या तिच्या मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या निर्णयावर टीका होऊ लागल्याने खड्ड्यांमुळेच हा अपघात घडला का, याची चाचपणी करुन संबंधीतांवरही गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी चालविली आहे. २६ जुलै रोजी अंबरनाथ डंपिंग ग्राऊंडसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. रिटा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर तब्बल सव्वा महिन्याने रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी गाडी चालविणारी त्यांची मुलगी प्रितीवरच गुन्हा दाखल केला. तर पिडीत कुटुंबियांनी या अपघातास एमएमआरडीए आणि ठेकेदारांना जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी उचलून धरली आहे. अंबरनाथमधील सामाजिक संस्थानीदेखील त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कल्याण-कर्जत महामार्ग ताब्यात घेतला आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याचे कामही एमएमआरडीनेच केले. मात्र अनेक ठिकाणी ते काम अर्धवटच ठेवले. ज्या रस्त्यावार अपघात झाला त्याची यापूर्वीही दुरवस्था झाली होती. दोन वर्षांपूर्वी त्याचे काम केल्यानंतरही पहिल्याच पावसात त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. डंपिंग ग्राऊंड समोरील रस्ता काँक्रिटचा केल्यावर उर्वरीत रस्ता पुन्हा डांबरीकरण करुन तो अर्धवटच ठेवला. या रस्त्यावर खड्डे पडणार याची माहिती असतांनाही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी काँक्रिटीकरण पूर्ण केले नाही. त्यातच पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची होती. मात्र ती न झाल्याने खड्डे तसेच राहिले आहेत. त्याचाच फटका प्रसाद कुटुंबियांना बसला. (प्रतिनिधी)