शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरच्या क्रीडा संकुलाचे दार उघडणार!

By admin | Updated: January 18, 2016 02:01 IST

निविदा मागवूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्याने फेब्रुवारी २०१४ पासून धूळखात पडलेले मीरा-भार्इंदर महापालिकेचे क्रीडा संकुल चालवण्यासाठी अखेर नवी

मीरा रोड : निविदा मागवूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्याने फेब्रुवारी २०१४ पासून धूळखात पडलेले मीरा-भार्इंदर महापालिकेचे क्रीडा संकुल चालवण्यासाठी अखेर नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनने तयारी दर्शवली आहे. होतकरू खेळाडूंसह नागरिकांसाठी सदर क्रीडा संकुल खुले व्हावे, याकरिता आयुक्त अच्युत हांगे यांनी पुढाकार घेतला आहे. न्यू गोल्डन नेस्टजवळील मनपाच्या जागेत शहराचे पहिले क्र ीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव तत्कालीन खासदार संजीव नाईक यांनी मांडला होता. मे २०१२ मध्ये संकुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर विलंबाने पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने कॅरमसारख्या स्पर्धा झाल्या. परंतु, अपूर्ण कामे व संकुल चालवण्यासाठी धोरण ठरले नसल्याने या संकुलाचे दरवाजे बंद होते.या संकुलाच्या उर्वरित कामासाठी अजून ३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आॅलिम्पिक दर्जाच्या तरणतलावासह लहान तरणतलाव, व्यायामशाळा, बॅडमिंटन, कॅरम, स्क्वॅश, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बास्केटबॉल आदी खेळांचा समावेश आहे. गेल्या वर्षी महासभेने क्र ीडा संकुल चालवण्यासाठीचे दर, निकष आदी धोरण निश्चित केले होते. त्यानंतर चार वेळा निविदा मागवून त्यास मुदतवाढ दिली. पालिकेने अनुदान देण्याची तयारीदेखील दर्शवली आहे. परंतु, राजकीय अपरिपक्वता व अनाठायी जाच लक्षात घेता सदर संकुल चालवण्यास कोणतीही संस्था पुढे यायला तयार नाही. सदर क्र ीडा संकुलाचे उद्घाटन होऊन दोन वर्षे होणार आहेत. शहरातील पालिकेचे पहिले क्र ीडा संकुल असून त्याची ही गत पाहून क्र ीडाप्रेमी नाराज आहेत. ती दूर होण्याची चिन्हे दिसत असून अलीकडेच आयुक्त दालनात नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनसोबत पहिली बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, भगवती शर्मा उपस्थित होते.