शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

कल्याण-डोंबिवलीतील अर्धवट रस्त्यांचा स्थायी समितीच्या सभेत पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 8:43 PM

शहराच्या पश्चिम भागातील संतोषीमाता रोडचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट असल्याने शाळकरी जेसलीन कुट्टी या ११ वर्षीय मुलाचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद आज पार पडलेल्य महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले.

कल्याण - शहराच्या पश्चिम भागातील संतोषीमाता रोडचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट असल्याने शाळकरी जेसलीन कुट्टी या ११ वर्षीय मुलाचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद आज पार पडलेल्य महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती राहूल दामले यांनी प्रशासनाला दिले आहे. त्याचबरोबर हा रस्ता २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन प्रशासनाकडून वदवून घेतली आहे.मुलाचा अपघात झाला त्याला महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे यांनी केला. संतोषी माता रस्ता हा आयुक्तांच्या बगल्याजवळ आहे. तसेच हा रस्ता मुरबाड रोड व कल्याण आग्रा रोडला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम २०१४ पासून सुरु आहे. यापूर्वीच्या कंत्राटदाराला प्रशासनाने ६ टक्के कमी दराने रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम दिले होते. त्याचे काम रद्द करण्यात आले.त्यानंतर दुसरा कंत्राट कंपनीला १५ टक्के जादा दराने निविदा दिली. २०१४ सालापासून रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम अर्धवट असल्याने जेसलीन या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या मृत्यूस महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. या आरोपाचे खंडन करताना शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी या अपघाताचा महापालिकेच्या रस्ते विकास कामाशी काही एक संबंध नाही. अपघात स्थळ हे अर्धवट कामापासून दूर आहे अशी माहिती दिली. त्याला म्हात्रे यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्याचबरोबर या प्रकरणी खुलासा करताना कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांनी सांगितले की, अपघाताशी कल्याण डोंबिवली महापालिकेचा संबंध नाही. कामात दिरंगाई झाली हे मान्य केले. रस्ते विकासाची कामे मार्च २०१७ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यात काही अडचणी आल्याचे कुलकर्णी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.मात्र एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी म्हात्रे यांनी उचलून धरली. त्यावर सभापती दामले यांनी सांगितले की, रोड चांगला असता तर अपघात झालाच नसता. आयुक्तांच्या बंगल्या समोरचा रस्ता प्रशासन वेळेत पूर्ण करु शकत नाही. त्याचबरोबर या बंगल्यात राहणारे चार आयुक्त यापूर्वी बदलून गेले. त्यांनाही हे काम वेळेत पूर्ण करावे अशी विचारणा प्रशासनातील अधिका-यांकडे करावीशी वाटली नाही. रस्ते विकासातील अडचणी सोडविण्यासाठी चार वर्षे लागतात. हे काही न पटण्यासारखे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभापती दामले यांनी प्रशासनाला दिले. या प्रकरणी शहर अभियंता यांची चौकशी होणार आहे. तसेच हा रस्ता कधी पूर्ण करणार त्याची डेडलाईन सांगा असे दामले यांनी प्रशासनाकडून वदवून घेतले. तेव्हा कार्यकारी अभियंता जोशी यांनी हा रस्ता २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण केला जाईल असे ठोस आश्वासन दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMuncipal Corporationनगर पालिका