मुंबईत पोलीस असल्याचे सांगत तरुणीशी लग्न केले, पण पोलिसाऐवजी निघाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 10:31 PM2019-05-06T22:31:35+5:302019-05-06T22:32:57+5:30

आपला नवरा पोलीस खात्यात नोकरीला नसल्याचा संशय करणच्या बायकोला आला. अवघ्या एका महिन्यात या घडामोडी घडल्याने तिने ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयात जाऊन किरणची माहिती काढली.

Married to a girl with cheating by mumbai Police, crime lodged in mumbai police | मुंबईत पोलीस असल्याचे सांगत तरुणीशी लग्न केले, पण पोलिसाऐवजी निघाला...

मुंबईत पोलीस असल्याचे सांगत तरुणीशी लग्न केले, पण पोलिसाऐवजी निघाला...

googlenewsNext

मुंबई - लग्नासाठी वाढत्या अपेक्षा आणि मुलींची घटलेली संख्या पाहून अनेकांकडून मुलींची आणि मुलींच्या कुटुबीयांची लग्नसाठी फसवणूक होत असल्याचं दिसत आहे. अंबरनाथ येथेही एका तरुणाने मुंबई पोलीस असल्याचे सांगत तरुणीची फसवणूक केली. विशेष म्हणजे लग्नानंतर एक महिन्याने तरुणीला हे सत्य समजले. त्यानंतर, पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित करुणीने रीतसर तक्रार दिली. 
मुंबईत पोलीस असल्याचे सांगत तोतया पोलिसाने एका तरुणीशी लग्न केले. लग्नानंतर महिनाभरातचा आपला नवरा पोलीस नसल्याचा तरुणीला संशय आला. त्यामुळे, पोलीस आयुक्तालयातून नवऱ्याबद्दल माहिती घेतल्यानंतर तिचा संशय खरा ठरला. 

किरण शिंदे असे आरोपीचे नाव असून वास्तविक जीवनात तो वॉचमन म्हणून काम करतो. मात्र, किरणने आपण मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असल्याचे सांगून अंबरनाथमधील 21 वर्षीय तरुणीशी विवाह केला. तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना पोलीस वर्दीतील फोटो, वर्दीवरील नेम प्लेट आणि ओळखपत्र दाखवल्याने किरणवर त्यांचा विश्वास बसला. 13 डिसेंबर 2018 ला तरुणीचे लग्न किरण शिंदेशी झाले. मात्र, वारंवार खाकी वर्दीवर घरी येणे, कामाची एकच नियमित वेळ असणे, याबाबत विचारणा करताच उडवाउडवीची उत्तरे देणे, त्यामुळे किरणचे बिंग फुटले.

आपला नवरा पोलीस खात्यात नोकरीला नसल्याचा संशय करणच्या बायकोला आला. अवघ्या एका महिन्यात या घडामोडी घडल्याने तिने ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयात जाऊन किरणची माहिती काढली. त्यावेळी, आपला नवरा पोलीस नसून वॉचमन असल्याचे समजताच तिला धक्काच बसला. त्यानंतर पीडित तरुणीने सापळा रचून पोलिसांच्या मतदाने किरणच्या नकली पोलिसाच बिंग उघडं पाडलं. तर, 21 वर्षीय मुलीला फसवणाऱ्या किरणला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या आणि मुलांच्या लग्नासंदर्भातील गंभीर समस्यांवर चर्चा सुरू झाली आहे. 
 

Web Title: Married to a girl with cheating by mumbai Police, crime lodged in mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.