शहरं
Join us  
Trending Stories
1
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
"२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
4
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
5
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
6
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
7
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
8
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
10
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
11
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
12
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
13
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
14
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
15
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
16
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
17
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
18
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
19
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
20
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 22:22 IST

मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (टीडीसीसी) निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देनिवडणुकीची जबाबदारी आर. सी. पाटील आणि गोपाळ लांडगे यांच्याकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ घातलेली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (टीडीसीसी) निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिली. याच निवडणुकीसाठी शिवसेना, कॉग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसची आढावा बैठक ठाण्यात झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
येत्या ३० मार्च रोजी टीडीसीसी बँकेसाठी मतदान प्रक्रीया होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी ठाण्याच्या एका हॉटेलमध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये पालकमंत्री शिंदे, गृहनिर्माण मंत्री तथा राष्टÑवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ठाणे- पालघर जिल्हयाचे प्रभारी राजेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी या निवडणुकीची जबाबदारी आर.सी. पाटील आणि गोपाळ लांडगे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली.
शिंदे यावेळी म्हणाले की, याआधी ही निवडणूक कधी गांभीर्याने घेतली नव्हती. मात्र, आता महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढविणार आहे. उमेदवार निवडीपासून महाविकास आघाडी एकत्रित काम करणार असून ही निवडणूक आम्हाला अवघड नाही.
तर आव्हाड यावेळी म्हणाले की, टीडीसीची निवडणूक लढवून आपल्या विचारांची एक संस्था ताब्यात घेऊन त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्याचा आपला उद्देश आहे. त्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. जर कार्यकर्त्यांनी एकत्र यायचे ठरविले तर त्यासाठी मेहनत करायला आम्ही तिन्ही पक्षांचे नेते सज्ज आहोत. सध्या ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे ही निवडणूक खूप सोपी आहे.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी, ‘‘ही सहकाराची निवडणूक आहे. सहकार अडचणीत आल्यावर सरकारने मदत करायची असते. गेले अनेक वर्षे आम्ही हेच करीत आलेलो आहोत. म्हणून सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र निवडणूक लढविणार आहोत. त्यामध्ये कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.’’ ही पहिलीच आढावा बैठक आहे. लवकरच जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ठाणे पालघर प्रभारी राजेश शर्मा, आमदार रवींद्र फाटक, शांताराम मोरे, जगन्नाथ शिंदे, ज्योती कलानी, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे- पालघर समन्वयक आनंद परांजपे, महापौर नरेश म्हस्के, ठाणे शहर काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष विक्र ांत चव्हाण, राष्टÑवादी काँग्रेसचे नगरसेवक हणमंत जगदाळे, टीडीसीसीचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील, दशरथ तिवरे आदी उपस्थित होते.
* दरम्यान, टीडीसीसी बँकेच्या २१ जागांसाठी येत्या ३० मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २६ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तर ५ मार्च रोजी छाननी होणार होईल. २१ मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तर, ३० मार्च रोजी मतदान आणि ३१ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीमध्ये कृषी-पतसंस्थांमधून १४, पगारदार पतसंस्थांमधून १, खरेदी-विक्र ी संघातून १, महिला राखीव २, अनुसुचित जाती-जमातींसाठी एक आणि ओबीसींसाठी एक जागा राखीव आहे. तीन हजार ६८ मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
 

टॅग्स :thaneठाणेbankबँकElectionनिवडणूक