शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : त्यांनी ईव्हीएमवर फेकली शाई; पोलिसांकडून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 16:51 IST

Maharashtra Election 2019 : ठाणे शहर विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असतानाच, सिव्हील रुग्णालयाजवळील एका केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर शाई फेकण्याचा प्रकार घडला.

ठाणे - ठाणे शहर विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असतानाच, सिव्हील रुग्णालयाजवळील एका केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जवळपास 25 मिनिटे थांबावावी लागली होती. ठाण्यातील बहुजन नेते असलेले सुनील खांबे यांनी हा प्रकार केला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुनील खांबे हे ठाणे विधानसभा मतदार संघातील सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले होते. मतदान झाल्यानंतर ते थेट मतदान केंद्राच्या बाहेर न पडता त्यांच्याजवळ असलेली शाईची बाटली बाहेर काढली. ती थेट त्यांनी ईव्हीएम मशीनवर फेकली. त्यामुळे मतदान केंद्रामध्ये आणि मशीनवर देखील ही शाई पडली. शाई फेकून त्यांनी मतदान केंद्रामध्येच इव्हीएम मशीनच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना मतदार केंद्राच्या बाहेर काढले. मात्र हा गोंधळ 15 ते 20 मिनिटे सुरू असल्याने 25 मिनिटे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर पुन्हा मतदान सुरू करण्यात आले. ईव्हीएम मशीन लोकशाहीसाठी घातक असून ही मशीन बंद करण्यात यावी अशी मागणी खांबे यांनी केली यावेळी केली आहे. खांबे यांना ठाणे नगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून मतदान केंद्रावरील अधिकारी यांच्या सुचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या 13व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी, 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मत प्रक्रियेमध्ये सुमारे 9 कोटी मतदार 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. राज्यात एकूण 8,98,39,600 मतदार असून यामध्ये 4,68,75,750 पुरुष, 4,28,43,635 महिला, 3,96,000 दिव्यांग, 1,17,581 सर्व्हिस मतदार आणि 2,634- तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, यासाठी आयोगाने केंद्रीय, तसेच राज्य राखीव दलाची मदत घेतली असून, राज्य पोलीस दलातील सुमारे 40 हजार कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर असतील. मतदान केंद्राचा परिसर आणि स्ट्राँगरूमच्या बाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेला प्रसंग निस्तारण्यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तयार ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच केंद्राच्या आतमध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

टॅग्स :thane-acठाणे शहरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानPoliceपोलिस