शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे वारे, गीता जैन अपक्ष लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 01:35 IST

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेले विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनीदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे.

मीरा रोड : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेले विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनीदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. शुक्रवारी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे पॅनल असूनही गीता जैन यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला होता. तरीदेखील जैन यांनी भार्इंदर पश्चिम येथील प्रभाग ६ मधून तब्बल नऊ हजार ९०० मते मिळवली होती. पालिका निवडणुकीत सर्वात जास्त मते मिळवणाऱ्या त्या उमेदवार ठरल्या. जैन यांनी मेहतांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे जैन यांच्यावर सोशल मीडियावरून अपशब्दांत टिप्पणी करण्यासह त्यांचे जाहिरात फलक काढणे, त्यांच्या नवरात्रीचा कार्यक्रम बंद करायला लावणे, पक्षाच्या बैठकांना न बोलावणे आदी प्रकार नागरिकांनी अनुभवले आहेत.जैन यांनी विधानसभा निवडणुकीची त्या २०१५ साली महापौर असतानापासूनच तयारी चालवली होती. उमेदवारीसाठी त्यांनी राज्यातल्या नेत्यांपासून दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी चालवल्या होत्या. परंतु, अपेक्षेप्रमाणे मेहतांना उमेदवारी मिळाल्याने आता जैन यांच्यासमोर अपक्ष म्हणून उभे राहण्याचा वा अन्य पक्षात जाण्याचा पर्याय असल्याचे जाणकारांचे मत आहे.जैन यांनी अद्याप आपले पत्ते खुले केले नसले, तरी शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणे निश्चित असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मेहतांना ए-बी फॉर्म दिले असले तरी जैन यांचे भाजपची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरूच असून, शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची त्यांची तयारी आहे. जैन यांची उमेदवारी मेहतांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे मानले जात आहे.गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या भूमिकेकडे लक्षमाजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी अजूनही आपली भूमिका उघड केलेली नाही. काँग्रेस आघाडीकडून माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. मेंडोन्सा यांनी जैन वा मुझफ्फर यांच्या बाजूने मैदानात उडी घेतली तर, मेहतांची डोकेदुखी वाढणार, हे निश्चित. त्यातही मुझफ्फर यांचे मीरा रोडमधील मतदारांशी असलेले व्यक्तिगत संबंध, उत्तनसह भार्इंदरच्या एखाद्या भागातील काँग्रेसची ताकद पाहता लढत ही तिरंगी ठरणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Mira Bhayanderमीरा-भाईंदरmira-bhayandar-acमीरा भायंदरBJPभाजपा