शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

उमेदवार मिळत नसेल तर बिनविरोध निवडून द्या, राजन विचारे यांनी काढला महायुतीला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 6:59 AM

Lok Sabha Election 2024 : गुरुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली.

ठाणे : ठाण्यात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई होणार आहे. परंतु, विरोधकांना अद्याप उमेदवार मिळत नसेल तर मला वाटते त्यांनी मला बिनविरोध निवडून द्यावे, असा टोला ठाणे लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

गुरुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत इंडिया आघाडीतील काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई उपस्थित होते.

विचारे म्हणाले की, आजच्या पवित्र दिवशी या ठिकाणी इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते नतमस्तक झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. त्यावेळेस सर्व जाती-धर्माचे लोक, बारा बलुतेदार, १८ पगड जातींना महाराजानी एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले.

त्याच पद्धतीने आज या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल. ज्या पद्धतीने सर्व पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे तसेच भ्रष्टाचारी लोकांना जवळ करण्याचे काम केले जात आहे. त्यास जनता कंटाळली आहे, अशी टीका त्यांनी भाजप सरकारचे नाव न घेता केली. 

टॅग्स :thaneठाणेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४