शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

'लोकल'ला बेशिस्तीचे ग्रहण! डोंबिवलीकरांचे हाल संपता संपेना; स्थानकावर दुसऱ्या दिवशीही तुडूंब गर्दी

By अनिकेत घमंडी | Updated: April 21, 2026 09:49 IST

मंगळवारी पहाटेपासूनच स्थानकात गर्दी झाली होती, अद्याप डाऊन स्लो वरील समस्या सुटली नसल्याने बहुतांशी डोंबिवली लोकल रद्द करण्यात आल्या होत्या.

-अनिकेत घमंडी, डोंबिवलीडोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी लोकल रेल्वेचा डबा घसरला. या अपघाताचे सलग दुसऱ्या दिवशीही परिणाम जाणवले. मंगळवारी पहाटेपासूनच स्थानकात गर्दी झाली होती, अद्याप डाऊन स्लो वरील समस्या सुटली नसल्याने बहुतांशी डोंबिवली लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. त्याऐवजी कल्याणवरून विशेष लोकल सोडण्यात आल्याचे रेल्वेने जाहीर केले. त्यामुळे प्रवाशांचे सकाळपासून हाल सुरू झाले. प्रवासी डोंबिवलीत आणि विशेष ट्रेन कल्याणवरून का सोडल्या, असा सवाल त्रस्त प्रवाशांनी केला.

सोमवारी डोंबिवलीकरांचे अतोनात हाल झाले. महिला, पुरुष, विद्यार्थी सगळ्यांना लोकल रेल्वेच्या दिरंगाईचा फटका बसला. सोमवारी दिवसभर सगळा घोळ सुरू होता. पण, मंगळवारही त्याचे परिणाम दिसत आहे. सकाळही अशीच त्रासाची गेल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

लोकलमध्ये चढायलाही जागा नाही

फलाट तीन, पाचवर मुंबईकडे जायला प्रचंड गर्दी होती. कर्जत, बदलापूर, कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा मार्गावरील लोकल आधीच भरून आल्याने डोंबिवलीच्या प्रवाशांना गाडीत चढायला जागा मिळाली नाही, परिणामी सर्व फलाट गर्दीने तुडूंब भरलेले होते. लोकल रेल्वे विलंबाने धावत असल्याने दिवा स्थानकातही प्रवाशांची गर्दी वाढत गेली.

सकाळच्या सत्रात अनेक गाड्या जलद सांगून धीम्या आणि धीम्या सांगून जलद काढल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. डोंबिवलीत गर्दी असल्याने ठाकुर्ली, कोपर स्थानकात देखील प्रचंड गर्दी झाली होती. एकूणच सोमवार नंतर मंगळवारची सुरुवातही मनस्ताप, घामाघुम, आणि लेटमार्कच्या दडपणाने झाली. 

रेल्वे प्रशासन यमाच्या भूमिकेत.....

रोज मरे त्याला कोण रेड हि उक्ती रेल्वे प्रवाशांच्या पाचवीला पुजलेली आहे. आज मुंबईकडून कल्याणच्या दिशेकडे जाणाऱ्या लोकलचे काही डबे रुळावरून घसरले आणि कसारा-कर्जतकडे जाणाऱ्या आणि कर्जत कसाराहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला. तब्बल सकाळी  8.30 पासून दुपारी चार वाजेपर्यंत वाहतूक विस्कळित झाली होती.

आजमितीस रेल्वेचे अनेक मोठ मोठे प्रकल्प सुरू आहेत, मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अधिकाऱ्यात समन्वय नसल्याने मागील पंधरा वर्षांपासून तिसरी रेल्वे मार्गिका अजूनही पूर्ण झालेली नाही.

मागील कोविड काळापासून  विशेष ट्रेनच्या नावाने सुरू केलेल्या मेल एक्सप्रेस मधे दिवसागणिक वाढ करून अजमितीत 50/60 मेल एक्सप्रेस रोज धावत आहेत, त्यामुळे रोजच आम्हा प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो, गर्दीमुळे रेल्वे प्रवासी रोज मरणयातना सहन करीत आहेत.-राजेश घनघाव, (अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना)

English
हिंदी सारांश
Web Title : Dombivli train chaos: Derailment aftermath, overcrowding cripples local travel.

Web Summary : Train derailment at Dombivli station caused severe overcrowding and cancellations, impacting commuters. Special trains from Kalyan couldn't ease the rush. Passengers faced delays, packed platforms, and disrupted schedules, extending travel woes.
टॅग्स :central railwayमध्य रेल्वेdombivaliडोंबिवलीMumbai Localमुंबई लोकलTrain Accidentरेल्वे अपघात