निष्ठावंतांना डावलून भाजपने दिली उपऱ्यांना ‘परिवहन’मध्ये संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:15 AM2020-02-27T00:15:25+5:302020-02-27T00:15:38+5:30

निष्ठावान नाराज असल्याने दगाफटका होण्याची शक्यता

Left by loyalists, BJP gives alien to 'transportation' | निष्ठावंतांना डावलून भाजपने दिली उपऱ्यांना ‘परिवहन’मध्ये संधी

निष्ठावंतांना डावलून भाजपने दिली उपऱ्यांना ‘परिवहन’मध्ये संधी

Next

ठाणे : ठाणे परिवहन समितीमध्ये १२ सदस्य निवडून जाणार असले तरी, त्यासाठी १४ जणांनी अर्ज सादर केले आहेत. त्यात भाजपला एका जागेवर रोखण्यासाठी राष्टÑवादी आणि शिवसेनेची खलबते सुरू आहेत. दुसरीकडे भाजपकडून दोन सदस्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, हे दोन्ही सदस्य इतर पक्षांतून आलेले असल्याने परिवहनमध्ये जाऊ इच्छिणाºया निष्ठावंतांच्या आशेला सुरुंग लागला आहे. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर असून याचे परिणाम मतदानाच्या दिवशी या दोन उमेदवारांना भोगावे लागण्याची शक्यता असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

ठाणे परिवहन समितीच्या सदस्यपदाची निवडणूक ४ मार्च रोजी होणार आहे. यासाठी १२ सदस्य निवडून जाणार असले, तरी १४ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपच्या वतीने सुरेश कोलते आणि विकास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, कोलते हे मनसेतून आणि विकास पाटील हे काँग्रेसमधून आल्याचे निष्ठावंतांचे म्हणणे आहे. आधीच शहर पातळीवरीलदेखील निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना संधी दिल्याने निष्ठावंतांमध्ये काहीशी नाराजी आहे.

२०१७ मधील महापालिकेच्या निवडणुकीतही पक्षात अनेक इच्छुक असताना उपºयांना संधी देत नगरसेवकाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर, आता अर्ध्याहून अधिक पक्ष उपºयांच्या हाती सोपविण्यात आला आहे. त्यामुळेही पक्षात काहीशी नाराजी आहे. त्यात आता परिवहनमध्ये पक्षातील निष्ठावान नगरसेवकांजवळ असलेल्या ८ ते १० जणांनी परिवहनमध्ये जाण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. परंतु, त्यांना डावलून पक्षाने पुन्हा उपºयांना संधी दिल्याने त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे परिणाम मतदानाच्या दिवशी होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. मतदान करताना एका नगरसेवकाला १२ मते एकाला किंवा १२ सदस्यांना वाटून देता येणार आहे. असे झाल्यास नाराज निष्ठावंतांकडूनच भाजपच्या उमेदवारांना दगाफटका सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ याबाबत काय काळजी घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Left by loyalists, BJP gives alien to 'transportation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.