शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:34 IST

यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, मुंबईतील एका विकासकाने घंटाळी भागात मोक्याचा भूखंड विकसीत करायला घेतला आहे. त्या जागेवर तीन अनधिकृत गाळे असून, त्यांचा एकच मालक आहे. हा गाळेधारक जागा रिकामी करीत नसल्याने विकासकाने अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली होती.

ठाणे : घंटाळी भागातील कोट्यवधी रुपयांचा भूखंड विकासकाने विकसीत करण्याकरिता घेतला होता. त्या जागेत तीन गाळे होते. ते गाळे काढून देण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे याने २५ लाख रुपयांची लाच मागितली होती. पाटोळेवर ठाण्यातील प्रभावशाली नेत्याचा वरदहस्त असतानाही मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गृह खात्याच्या इशाऱ्यावरून ही कारवाई केल्याची चर्चा आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, मुंबईतील एका विकासकाने घंटाळी भागात मोक्याचा भूखंड विकसीत करायला घेतला आहे. त्या जागेवर तीन अनधिकृत गाळे असून, त्यांचा एकच मालक आहे. हा गाळेधारक जागा रिकामी करीत नसल्याने विकासकाने अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली होती. गाळे जमीनदोस्त करण्याकरिता विकासकाने पाटोळे यांना १० लाख दिले होते. परंतु, पैसे दिल्यानंतरही गाळे जमीनदोस्त न केल्याने विकासक हैराण झाला होता. त्याने कारवाईसाठी वारंवार पाटोळे यांची भेट घेतली होती. एका प्रभावशाली नेत्याच्या जवळ असलेल्या या विकासकाला पाटोळे यांनी केबीन बाहेर पाच तास ताटकळत ठेवल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. विकासकाने कारवाईकरिता १० लाख दिल्यानंतर आणखी पैशांची मागणी पाटोळे यांनी विकासकाकडे केली. महापालिकेच्या वर्धापन दिनाचा सोहळा सुरू असताना, पाटोळे यांनी महापालिका मुख्यालयात विकासकाला पैसे घेऊन बोलवले. अखेर सांयकाळी ५:३० च्या सुमारास विकासक पैसे घेऊन आला, पाटोळे पैसे घेत असताना एसीबीच्या सापळ्यात अडकला.

अनेक वर्षांपासून पुनर्वसन रखडले

घंटाळी भागात विकासकाच्या जागेवर असलेले तीन गाळे हे मागील कित्येक वर्षांपासून त्याठिकाणी आहेत. काही वर्षांपूर्वी येथे रस्ता रुंदीकरण झाले आणि रस्त्यात गाळेधारकाची अर्धी जागा गेली. 

महापालिकेने त्यांचे पुनर्वसन करून देणार, असे सांगितले होते. मात्र, त्यांचे पुनर्वसन अद्याप झाले नाही. आधी पुनर्वसन करा मगच जागा खाली करण्याची मागणी गाळेधारकाने केल्याचे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

उपायुक्त पाटोळे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना ठाणे न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची एसीबी कोठडी सुनावली. एका खासगी जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला सहकार्य करून नोटीस बजावण्यासाठी पाटोळे यांनी दहा लाख रुपये घेतले होते. तर संपूर्ण कारवाईसाठी ५० लाखांची मागणी केली. यातील २५ लाखांचा पहिला हप्ता घेतानाच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)  मुंबई पथकाने बुधवारी पकडले. 

नौपाडा पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने ठाण्याच्या नौपाड्यातील विष्णूनगर भागातील जागा विकसित करण्यासाठी घेतली. या जागेत तीन दुकाने अनधिकृतपणे बांधलेली आहेत. त्याची तक्रार जागामालकाने महापालिकेकडे वारंवार करूनही त्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती. अखेर ८७ वर्षांच्या या जागामालकाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला सर्व अधिकारपत्र दिले. याच अनधिकृत दुकानांवर कारवाईसाठी या तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने उपायुक्त पाटोळे यांची पालिकेतील त्यांच्या दालनात भेट घेतली हाेती.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane Deputy Commissioner caught accepting bribe for demolition work.

Web Summary : Thane Deputy Commissioner Shankar Patole demanded a bribe to demolish illegal shops. He took ₹10 lakh initially but demanded more. ACB caught him accepting ₹25 lakh. A builder had waited five hours for him.
टॅग्स :thaneठाणेArrestअटक