शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी नागरिकांना मोफत तुरडाळ आणि खाद्य तेल वाटपाच्या योजनेचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 08:20 IST

'भूक' हे कुपोषणाचे मुख्य कारण आहे त्यामुळे या भूकेवर उपाय म्हणून विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून जव्हार व मोखाडा तालुक्यातील ४०१९२ आदिवासी नागरिकांना २ किलो तुरडाळ व एक किलो खाद्य तेलाचा लाभ मिळणार आहे.

जव्हार: पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना कुपोषण निर्मुलनासाठी प्रत्येकी २ किलो तुरडाळ व १ किलो खाद्य तेल मोफत देण्याच्या पथदर्शी योजनेचा शुभारंभ आज राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. कुपोषणामुळे जव्हार मोखाडा तसेच राज्यातील इतर भागात शेकडो बालकांच्या मृत्युमुळे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. 

त्यावेळी 'भूक' हे कुपोषणाचे मुख्य कारण आहे त्यामुळे या भूकेवर उपाय म्हणून विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून जव्हार व मोखाडा तालुक्यातील ४०१९२ आदिवासी नागरिकांना २ किलो तुरडाळ व एक किलो खाद्य तेलाचा लाभ मिळणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाला  ६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे ही  योजना ६ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यास संपूर्ण राज्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच संपुर्ण देशात पहिल्यांदाच जव्हार व मोखाडा येथे अशाप्रकारची योजना राबविण्यात येत असल्याचे पंडित यांनी सांगितले. यावेळी मार्ग दर्शन करताना "आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जर एखाद्या स्वस्त धान्य दुकानदाराने तुरडाळ किंवा खाद्य तेल काळ्या बाजारात  विकण्याचा प्रयत्न केला तर अशा दुकादारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार (essential commodities act) गुन्हे दाखल करण्याचे आदेश पंडित यांनी दिले. 

आदिवासी नागरिकांनची क्रयशक्ती कमी असल्यामुळे  संपूर्ण कुटुंबाचे  पोषण व्हावे, त्यांची रोगप्रतिकारशक्ति वाढावी यासाठी या योजनेद्वारे  मोफत डाळ व खाद्य तेल  देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जव्हार येथील आदिवासी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला विवेक पंडित यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी संजय अहिरे, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. हेमंत सावरा तसेच इतर अधिकारी व मान्यवरांसह आदिवासी बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित  होते.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना