शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

शुद्ध पाण्यासाठी किआॅस्कचा उतारा

By admin | Updated: October 26, 2015 00:44 IST

ठाण्यातील ज्या भागात पाणी पोहोचत नाही अथवा जे भाग अद्याप विकसित झालेले नाहीत, तसेच काही झोपडपट्टी भागात आता पीपीपीच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : ठाण्यातील ज्या भागात पाणी पोहोचत नाही अथवा जे भाग अद्याप विकसित झालेले नाहीत, तसेच काही झोपडपट्टी भागात आता पीपीपीच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका २० लीटरमागे सात रुपये वसूल करणार आहे. त्यातून विशेष म्हणजे यासाठी किआॅस्कचा वापर करून त्या ठिकाणी एटीएम कार्डप्रमाणे कार्ड दिले जाणार असून ते स्वाइप केल्यावर जेवढे पाणी हवे आहे, तेवढे उपलब्ध होणार आहे. परंतु, यामुळे टँकरलॉबीला आळा बसणार असून टँकरपेक्षा कमी दरात हे पाणी उपलब्ध होणार आहे. ठाणे शहर दिवसेंदिवस विस्तारत असून जिथे जागा मिळेल तिथे नागरी वस्ती निर्माण होत आहे. परिणामी, पालिकेच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या नागरी सुविधांवरदेखील ताण पडत असून काही परिसरात तर पाण्यासारखी मूलभूत सुविधा पुरवणे पालिकेला शक्य नाही. या परिसरात पालिकेच्या पाइपलाइन टाकणेदेखील अशक्य असल्याने नागरिकांना जास्त पैसे देऊन टँकरचे पाणी वापरण्याशिवाय पर्याय नाही. महासभेत या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अशा परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी किआॅस्क या वितरण व्यवस्थेचा पर्याय पालिकेने शोधला आहे. त्यानुसार, पीपीपी तत्त्वावर ही प्रणाली विकसित होणार आहे. पाच वर्षांसाठी हा प्रकल्प खाजगी संस्था चालविणार आहे. (प्रतिनिधी)