शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खारेगाव टोल नाका आज मध्यरात्रीपासून होणार बंद

By admin | Updated: May 13, 2017 08:16 IST

राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका अखेर आजपासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी मुंबई, दि. 13 -   राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका अखेर आजपासून (13 मे) कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद होणार आहे.
 
मुंबई-नाशिक महामार्गावरील या रस्त्याच्या उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याचे आयआरबी कंपनीने म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा टोल नाका बंद करण्याचे आदेश दिले होते. अखेर वाहनचालकांची टोलच्या कटकटीतून सुटका होणार आहे.
 
मुंबईहून नाशिककडे जाताना ठाण्यानंतर लागणारा पहिला टोल नाका म्हणजे भिवंडी बायपासवरील खारेगावचा टोल नाका. येथून दिवसाला हजारो वाहने ये-जा करतात. त्यातून आयआरबी कंपनीला दिवसाला लाखो रुपयांचा टोल मिळतो. 1998 साली हा टोल नाका उभारण्यात आला होता. तेव्हापासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीच्या खर्चापोटी 180 कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे होते.
 
मात्र, प्रत्यक्षात कंपनीने यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वसुली केल्याचा दावा ठाण्यात राहणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी केला आहे. याबाबत, ते अनेक वर्षांपासून टोल नाका बंद करण्यासाठी पाठपुरावा करत होते. टोल नाका बंद होणार म्हटल्यानंतर वाहनचालकांचीही महिन्याला हजारो रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे साहजिकच वाहनचालकांनी या गोष्टीवर आनंद व्यक्त केला आहे.
 
चालकांना दिलासा
खारेगाव हा राज्यातील पहिलाच टोल नाका आहे. टोलवसुली बंद झाल्यामुळे 13 मे पासून वाहनचालकांना टोल भरण्याची गरज नाही, त्यामुळे प्रवाशांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 1998 साली राज्यातील हा टोल नाका सर्वप्रथम उभारण्यात आला होता.