शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
2
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
5
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
6
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
7
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
8
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
12
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
13
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
14
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
15
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
16
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
17
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
18
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
19
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
20
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
Daily Top 2Weekly Top 5

खडवली येथे भातसा नदीत दोघे बुडाले

By admin | Updated: March 26, 2016 03:35 IST

रंगपंचमी खेळून झाल्यानंतर खडवली येथील भातसा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली.

टिटवाळा : रंगपंचमी खेळून झाल्यानंतर खडवली येथील भातसा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली.
‘सगुणा चिकन फूड’ कंपनीच्या कल्याण शाखेतील कामगार महेंद्र खैरनार (३२) व हनुमंत ताळे (३६) यांच्यासह पाच ते सहा जण गुरुवारी रंगपंचमी खेळून झाल्यावर खडवली येथील भातसा नदीकिनारी पिकनिक स्पॉटवर आले. आंघोळीसाठी ते सर्व जण नदीपात्रात उतरले. मात्र खैरनार आणि ताळे यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू
लागले. त्यांच्या मित्रांपैकी कुणालाही पोहता येत नसल्याने त्यांनी मदतीसाठी ओरडाओरड केली. नदीवर गर्दी असतानाही कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही.
स्थानिक पोलीस व कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध
घेतला. पण ते सापडले नाहीत. शुक्रवारी सकाळी ६ वाजता खैरनार यांचा मृतदेह आढळला.
तो शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस नाईक संतोष मोरे यांनी दिली. तर टिटवाळा पोलीस, पोलीस पाटील, पोहणारे स्थानिक तरुण, अग्निशमन दलाचे जवान ताळे यांचा शोध घेत होते. अखेर सायंकाळी ५ वाजता त्यांचा मृतदेह सापडला. (प्रतिनिधी)