शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी लावणार दीड लाख झाडे

By admin | Updated: June 25, 2016 01:32 IST

राज्य सरकारने १ जुलैला राज्यभरात दोन कोटी झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने केडीएमसीला २० हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.

कल्याण : राज्य सरकारने १ जुलैला राज्यभरात दोन कोटी झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने केडीएमसीला २० हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्याची पूर्वतयारी झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त वर्षभरात सव्वा लाख झाडे लावण्यात येणार आहेत.
महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वृक्षारोपणाच्या विशेष मोहिमेत महापालिकेबरोबरच विकासकांचेही मोठे योगदान असणार आहे. आपटा, कांचन, नीम, बहावा, आवळा, करंज, गुलमोहर, सोनमोहर, बेल आदी झाडांची रोपे नागरिकांना दिली जाणार आहेत. तसेच सामाजिक संस्था, मंडळे, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, ज्येष्ठ नागरिक संस्था यांनाही रोपे दिली जाणार आहेत. रोपांची लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी संबंधित संस्थांची राहणार आहे.
वृक्षारोपण करणाऱ्या संस्था व देखभाल करणाऱ्या संस्थांना विकासकांना ट्री- गार्डसवर स्वत:ची जाहिरात करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत महापालिकेशी थेट संपर्क साधावा अथवा नगरसेवकाच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला जाईल, अशी माहिती देवळेकर यांनी दिली. महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)