केडीएमसीने थकबाकीदारांच्या ७०३ गाळ्यांना लावले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:57 AM2019-11-13T00:57:37+5:302019-11-13T00:57:44+5:30

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीकरिता थकबाकीदारांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

KDMC seals 3 plots of outstanding ones | केडीएमसीने थकबाकीदारांच्या ७०३ गाळ्यांना लावले सील

केडीएमसीने थकबाकीदारांच्या ७०३ गाळ्यांना लावले सील

Next

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीकरिता थकबाकीदारांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. एप्रिलपासून आतापर्यंत मालमत्ता कराची थकबाकी असलेले ७०३ गाळे सील करण्यात आले असून १६५ कोटी ३९ लाख रुपयांची कराची वसुली केली आहे. यंदाचे करवसुलीचे लक्ष्य ४५० कोटी रुपयांचे असून ते गाठण्यासाठी महापालिकेच्या हातात अद्याप साडेचार महिने शिल्लक आहेत. अर्थात उद्दीष्ट गाठण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाला अद्याप बरीच कसरत करावी लागणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून मालमत्ताकर वाढीचा प्रस्ताव महासभेत ठेवला जातो. मात्र या प्रस्तावाला सदस्यांचा विरोध आहे. महापालिकेत ज्या वेळेस जवाहरल नेहरू नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत प्रकल्प मंजूर करण्यात आले तेव्हा महापालिकेने २२ टक्के करवाढ दोन टप्प्यात केली होती. पहिल्या टप्प्यात ११ टक्के व दुसऱ्या टप्प्यात ११ टक्के करवाढ केली. या शर्तीवर योजना मंजूर झाल्या होत्या. महापालिकेतील करदाता हा विविध करांच्या स्वरुपात ७१ टक्के कर भरत आहे. अन्य महापालिकेच्या तुलनेत कर आकारणी जास्त आहे. हा कर कमी करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती ठीक नाही. मालमत्ता करातून मिळणाºया उत्पन्नाच्या आधारे महापालिका क्षेत्रातील विकास कामे केली जातात. आयुक्तांचा अर्थसंकल्प व स्थायी समितीने सुधारित केलेल्या अर्थसंकल्पात बरीच तफावत आहे. प्रत्यक्षातील उत्पन्न व केला जाणारा खर्च यात अंतर आहे. त्यामुळे विकास कामे होत नसल्याची ओरड सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसह विरोधी पक्षाचे नगरसेवक करतात.
महापालिके प्रशासनाने मालमत्ता करातून मागच्या वर्षी कर वसुलीचे ३५० कोटी रुपयांचे उद्दीष्ट निश्चित केले होते. रोखरकमेच्या स्वरूपात व जप्त केलेल्या मालमत्तांची किंमत धरुन हे उद्दीष्ट गाठल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. कर वसुलीचे काम जानेवारीनंतर गतिमान पद्धतीने केले जाते. मात्र यंदाच्या वर्षी कर वसुली विभागाने एप्रिल
महिन्यापासूनच वसुलीच्या कामाला सुरुवात केली होती. थकबाकीदारांच्या विरोधात त्यांची मालमत्ता सील करण्याचे काम वर्षाच्या शेवटी न करता सुरुवातीपासून करण्याचा पायंडा यंदाच्या वर्षीपासून सुरु केला आहे. मालमत्ता कर वसुली विभागाचे कर निर्धारक व संकलक विनय कुलकर्णी यांनी एप्रिल ते आत्तापर्यंत मालमत्ता कराची थकबाकी असणाºया ७०३ गाळेधारकांचे गाळे सील करण्याची कारवाई केली आहे. आटाळी येथे केलेल्या कारवाईतून गेल्या आठवड्यात दोन लाख रुपये वसूल केले होते.
दरम्यान, एप्रिलच्या सुरुवातीला लोकसभेची निवडणूक होती तर सप्टेंबर व आॅक्टोबर हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कामकाजात गेला. त्यामुळे त्याचा वसुलीवर परिणाम झाला.
>साडेचार महिन्यांत २८५ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य
विधानसभा निवडणुकीच्या आधी वसुली विभागाकडून जवळपास १३१ कोटी रुपये वसुली केली होती. निवडणुकीची आचारसंहिता संपताच कामगारांनी पुन्हा कारवाई गतिमान केली. आजमितीस वसुलीची रक्कम १६५ कोटी ३९ लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे. २५ आॅक्टोबर ते आजपर्यंत अवघ्या २० दिवसांत महापालिकेने २४ कोटी रुपयांची वसुली केली आहे. महापालिकेने यंदा वसुलीचे लक्ष्य ४५० कोटी रुपये ठेवले आहे.आत्तापर्यंत झालेली कराची वसुली पाहता येत्या साडेचार महिन्यांत महापालिकेस २८५ कोटी रुपये वसूल करायचे आहेत. दोन निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक लागला नसता तर आतापर्यंत २०० कोटी रुपयांची वसुली केली गेली असती, असा अंदाज वसुली विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: KDMC seals 3 plots of outstanding ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.