शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा केडीएमसी पॅटर्न धोक्यात?

By admin | Updated: May 13, 2017 00:57 IST

एकमेकांसमोर लढायचे आणि नंतर सत्तेकरिता एकत्र यायचे, हा भाजपा-शिवसेनेतील ‘कल्याण-डोंबिवली पॅटर्न’ उभय पक्षांतील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकमेकांसमोर लढायचे आणि नंतर सत्तेकरिता एकत्र यायचे, हा भाजपा-शिवसेनेतील ‘कल्याण-डोंबिवली पॅटर्न’ उभय पक्षांतील तणाव वाढल्याने संकटात आला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांविरुद्ध काढलेल्या उद्गारांच्या निषेधार्थ शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे बिथरलेल्या भाजपाने गुरुवारी रात्री चौधरी यांच्या तोंडाला काळे फासले, तर संतप्त शिवसैनिकांनी डोंबिवलीमधील भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर तोडफोड केली. चौधरी यांना काळे फासल्याबद्दल डोंबिवली ग्रामीणचे भाजपा अध्यक्ष महेश पाटील यांच्यासह चार जणांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आणि त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. भाजपा कार्यालयाची तोडफोड केल्याबद्दल शिवसैनिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.गुरुवारी राज्यभर शिवसेनेने दानवेंविरोधात निषेध आंदोलन केले. यामुळे अगोदरच तणावात असलेल्या युतीमध्ये आणखी तणाव वाढला. सायंकाळी भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्राची होळी करून प्रत्युत्तर दिले. मात्र, दानवे यांच्यावर टीका करताना सेनेचा तोल गेल्याने याचा वचपा काढण्याचे डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांनी ठरवले आणि भाऊसाहेब चौधरी व उपशहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्या अंगावर महेश पाटील यांनी शाई टाकण्याची घटना गुरुवारी रात्री ९.२० च्या सुमारास गोग्रासवाडी परिसरात घडली. यामुळे संतप्त शिवसैनिक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापाशी जमा झाले. पाटील व अन्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीकरिता शिवसैनिकांनी रामनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनीही पोलीस ठाण्यास भेट देऊन कारवाईची मागणी केली. अखेर पहाटे २.३० च्या सुमारास गुन्हा दाखल झाला.