शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

‘कल्याण’ शिवसेनेचेच यावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: November 3, 2015 01:10 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष होण्याकरिता कल्याण पश्चिमेतील २८ जागांपैकी शिवसेनेच्या पारड्यात पडलेल्या २१ जागा तर पूर्वेतील

- प्रशांत माने,  कल्याण कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष होण्याकरिता कल्याण पश्चिमेतील २८ जागांपैकी शिवसेनेच्या पारड्यात पडलेल्या २१ जागा तर पूर्वेतील २० पैकी १६ जागांवर मिळालेले यश हेच मुख्य कारण ठरले आहे. एकूण ५२ जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या शिवसेनेचे कल्याण याच ३७ जागांमुळे झाले. एकीकडे कल्याणने शिवसेनेला भरभरून दिले असताना याच शहरातून त्यांच्या महापौर कल्याणी पाटील यांच्यासह सभागृह नेते कैलास शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला एकूण ३१ जागा मिळाल्या होत्या. यावेळेस तर ती सर एकट्या कल्याणातूनच भरुन निघाली आहे. त्यामुळे डोंबिवलीसह टिटवाळा, आणि ग्रामीण भागातून सेनेला मिळालेले यश हे बोनस पकडले जात असल्याचे स्पष्ट झाले.उंबर्डे, गांधारे, बारावे, मोईली, वडवली, आंबिवली, बल्याणी, शहाड, मिलींद नगर, वायले नगर, म्हसोबा मैदान, रामदास वाडी, रामबाग खडक, श्रेयस समेळ, बिर्ला कॉलेज, वडवली, रामदासवाडी, बैलबाजार, अशोक नगर, गावदेवी आदी भागातून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे या ठिकाणी भगवा डौलाने फडकला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते आपल्या शेवटच्या सभेला कल्याणमध्ये आले होते तेव्हा ही विजयाची सभा असल्याचे म्हंटले होते. कल्याणमधील सैनिकांचीही कडवा, कट्टर शिवसैनिक अशीच ओळख आहे. त्यांच्यामध्ये पक्ष आदेशाला प्रचंड महत्व असून डोंबिवलीतील सैनिकांच्या तुलनेने ते अधिक आक्रमक आणि स्पर्धेत पुढे असल्याचेही वेळोवेळी दिसून आले. दुर्गाडी गडावरचा घंटानाद असो की श्री मलंग यात्रा अशा हिंदुत्वाच्या मुद्यावर त्या ठिकाणचा सैनिक एकजुटीने कार्यरत असतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचेही कल्याणकरांवर विशेष प्रेम होते. धर्मवीर आनंद दिघेंना मानणारे नेते अजुनही त्यांच्या स्मृतींना उजाळा देतांना तसे हिंदुत्व आता नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करतात. कल्याणमध्ये शिवसेना स्ट्राँग असल्याची जाण पालकमंत्री एकनाथ शिंदेंना होती, म्हणूनच की काय त्यांनी तुलनेने ‘वीक’ असलेल्या डोंबिवलीत जरा जास्त लक्ष घातले होेते. गेल्या पंधरवड्यात त्यांनी डोंबिवलीतच ठाण मांडले होते. कल्याणकरांनी शिवसेनेला भरभरून दिले तरीही त्यांना सत्तेच्या मॅजीक फिगरपासून दूर राहावे लागले आहे. भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनीही गेल्या काही दिवसात शिवसेनेला अंगावर घेण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे डोंबिवलीचे माहीत नाही, पण कल्याणात सेनाच अग्रक्रमी असणार असा चंग तेथील नेत्यांनी बांधला होता, झाले ही तसेच.कल्याण पूर्वेत मात्र भाजपचे नामोनिषाण नव्हते, आमदार गणपत गायकवाड यांनी त्या ठिकाणी भाजपाचे कमळ फुलवले असले तरीही शिवसेनेला चांगले यश मिळाले..