शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत शिवजयंती उत्साहात

By admin | Updated: February 20, 2017 05:31 IST

डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी पूर्व विभागातर्फे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

डोंबिवली : डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी पूर्व विभागातर्फे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मध्यवर्ती काँग्रेस कमिटी कार्यालयाजवळून लेझीम पथकांसह वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये आरबीटी स्कूलच्या ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. भाजी मार्केट, बाजीप्रभू चौक, केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय, शिवाजी पुतळा, कॅनरा बँकेकडून ही मिरवणूक पुन्हा कार्यालयाजवळ आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराजांचे पोवाडे सादर करण्यात आले. यावेळी ‘अ’ ब्लॉक अध्यक्ष गंगाराम शेलार, ‘ब’ ब्लॉक अध्यक्ष रमेशचंद्र जैन, उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षद पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवाजी चौक, कल्याण येथील पुतळ्यास आणि महापालिका मुख्यालय येथे महाराज यांच्या प्रतिमेस महापौर राजेंद्र देवळेकर, पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त दीपक पाटील, नितीन नार्वेकर, पालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता यशवंत सोनोने, प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे उपस्थित होते. तसेच दुर्गामाता चौक येथेदेखील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला.डोंबिवलीत सभागृहनेते राजेश मोरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी ई प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार, फ प्रभागाच्या अधिकारी श्वेता सिंगासने उपस्थित होत्या. शिवनिष्ठ सेवा तरुण मंडळातर्फे बाइक रॅली काढली. ५० बाइक या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. वसंत व्हॅली येथून या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर, ती आधारवाडी चौक, लालचौकी अशी फिरून तिचा शिवाजी चौकात समारोप झाला. शिवप्रेमींनी भगवे फेटे परिधान केले होते. (प्रतिनिधी)कोळसेवाडीत नाटकाचे सादरीकरणकल्याण (पू.) सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या इतिहासात प्रथमच प्रचंड पोलीस बंदोबस्तात ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे सादरीकरण झाले. दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर या वेळी प्रचंड गर्दी होती. दंगलविरोधी पथक, गस्ती पथकांच्या गाड्या असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण होते.