शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
2
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
5
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
6
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
7
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
8
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
12
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
13
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
14
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
15
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
16
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
17
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
18
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
19
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
20
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
Daily Top 2Weekly Top 5

जीन्स कारखाने १० दिवसांत बंद

By admin | Updated: March 25, 2016 00:56 IST

वालधुनी आणि उल्हास नदी प्रदूषित करणारे उल्हासनगरमधील जीन्स कारखाने येत्या १० दिवसांत बंद करण्याचे आणि त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी

उल्हासनगर : वालधुनी आणि उल्हास नदी प्रदूषित करणारे उल्हासनगरमधील जीन्स कारखाने येत्या १० दिवसांत बंद करण्याचे आणि त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रदूषण मंडळ व पालिकेला दिले आहेत. प्रदूषणाचे नियम धुडकावणाऱ्या, सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते तसेच नदीत सोडणाऱ्या कारखानदारांचे यामुळे धाबे दणाणले असून त्यांनी आता कामगार बेरोजगार होणार असल्याचे कारण पुढे केले आहे. त्याच वेळी पालिकेने मात्र कारखान्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ४ आणि ५ मध्ये ५०० हून अधिक जीन्स कारखाने आहेत. त्यांच्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट वालधुनी नदीत सोडतात. त्यामुळे ती नदी प्रदूषित झाली आहे.
मृतावस्थेत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हरित लवादाने
यापूर्वीच उल्हास नदीसह वालधुनी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. अखेर उल्हास नदी प्रदूषित करणाऱ्या खेमाणी नाल्याचा प्रवाह बदल्याचे काम पालिकेने सरकारच्या मदतीने सुरू केले आहे.
पर्यावरणमंत्री कदम यांनी वालधुनी व उल्हास नदीच्या प्रदूषणाबाबत पालिका आयुक्त मनोहर हिरे, शहर अभियंता कलई सेलवन, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बेकायदा जीन्स कारखाने सांडपाणी थेट नदीत सोडत असल्याबद्दल काय कारवाई केली, असा प्रश्न प्रदूषण मंडळासह पालिका आयुक्तांना केला आणि १० दिवसांत कारवाई करून तसा अहवाल पाठवण्याचा आदेशही दिला.

११० कारखान्यांना नोटिसा
पालिकेने ११० जीन्स कारखान्यांना कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली आहे. तसेच परवान्यासह इतर कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. यातील ३८ कारखान्यांची पाणीजोडणी तोडल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. मुदतीत कागदपत्रे सादर न कारखान्यांची वीज तोडण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. जीन्स कारखान्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याची लेखी हमी दिल्यानंतरच या कारवाईवर तोडगा काढला जाणार आहे.

कारखान्यांवर कारवाई अटळ
शहरातील ९५ टक्के कारखान्यांकडे
कोणतीही कागदपत्रे नसल्याने कारवाई अटळ आहे. वर्षभरापूर्वी कारखान्यांवर कारवाई सुरू झाली होती.
कारखानामालकांच्या संघटनेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे आश्वासन
दिले होते.
तसेच जिल्हास्तरावरील दबंग नेत्यांनी मध्यस्थी करत कारवाईत अडथळा आणला होता.

नद्यांच्या शुद्धीकरणासाठी निधीची मागणी
ठाणे जिल्ह्यातील वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने निधी देण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी लोकसभेत केली.
वालधुनी नदीचे नाल्यात रूपांतर झाले असून तिच्या शुद्धीकरणासाठी राज्य सरकारने वालधुनी नदी प्राधिकरणाची स्थापना केली. तिच्या शुद्धीकरणाचा खर्च ६५० कोटी रु पये आहे. तो स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावा, असे सरकारचे म्हणणे आहे.
मात्र, पालिकांची ती क्षमता नाही. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्यात आला आहे. त्यासाठी केंद्राने निधी देण्याची मागणी त्यांनी केली.