शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाडांच्या उपस्थितीत झालेल्या मारहाणीची चौकशी करा; आमदार केळकर, डावखरेंची पोलीस आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 23:46 IST

याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

ठाणे  : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर फेसबूक कमेंट करणाऱ्या अनंत करमुसे यांना झालेली मारहाण हा गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे, मोबाईल टॉर्च प्रज्वलित करण्याच्या आवाहनावर आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर घोडबंदर रोड येथील रहिवासी अनंत करमुसे यांनी कमेंट केली होती. त्यावरुन गणवेशातील दोघा पोलिसांसह चौघा जणांनी करमुसे यांना घरातून आव्हाड यांच्या ठाणे येथील बंगल्यावर नेले होते. त्यानंतर ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी आव्हाडांच्या उपस्थितीतच १५ ते २० जणांनी करमुसे त्यांना मारहाण केली. पोलिसांच्याच फायबर काठीने मारहाण झाली असल्याचा करमुसे यांचा आरोप आहे. या मारहाणीच्यावेळी आव्हाड यांची उपस्थिती होती, असे वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत करमुसे यांनी म्हटले आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची गरज आहे. फिर्यादीला पोलिसांनीच बेकायदा थेट मंत्र्यांच्या बंगल्यावर नेले. त्यानंतर पोलिसांसमोरच १५ ते २० जणांनी मारहाण केली. त्यानंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यात फिर्यादीला आणण्यात आले. या प्रकरणात खुद्द मंत्र्याचाच सहभाग असल्याचा आरोप असल्याने, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार केळकर आणि  डावखरे यांनी फणसळकर यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड