शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य शिकलकर टाेळीतील अट्टल चाेरटे जेरबंद: दागिन्यांसह ३९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: September 26, 2025 19:22 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी: ४० गुन्हे उघडकीस

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पुणे, अहिल्यानगर आणि ठाणे परिसरात घरफाेडी, चाेऱ्या करणाऱ्या आंतरराज्य शिकलकर टाेळीतील विजयसिंह अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (२४, रा. हडपसर, पुणे) याच्यासह चार जणांच्या अट्टल चाेरटयांनाअटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून साेन्या, चांदीच्या दागिन्यांसह ३९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टाेळीचे तब्बल ४० गुन्हे उघडकीस आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे आणि नवी मुंबई आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात घरफाेडी चाेरीचे अनेक गुन्हे घडले होते. बंद घरे फोडून मोठया प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने तसेच राेख रक्कमही चाेरी झाली हाेती. चाेरीचे गुन्हे उघडीस आणण्याचे आदेश पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी गुन्हे आढावा बैठकीत अलिकडेच दिले हाेते. गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पाेलीस आयुक्त डाॅ. पंजाबराव उगले, उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण युनिटचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाकडून समांतर तपास सुरु हाेता. गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे या पथकाने आरोपींचा शाेध सुरु केला. यापूर्वी चाेरीचे गुन्हे दाखल असलेल्या शिकलकर टाेळीतील सराईत चाेरटयांवरही पाळत ठेवली. यातूनच विजयसिंग आणि साेनूसिंग जुन्नी (२७, दाेघेही राहणार हडपसर, पुणे ) या दाेघांना ८ सप्टेंबर २०२५ राेजी डाेंबिवलीमध्ये सापळा लावून ताब्यात घेतले. त्यापाठाेपाठ सन्नी सरदार (२७, आंबिवली, कल्याण ) आणि अतुल खंडाळे उर्फ खंडागळे ( २४, रा. हडपसर, पुणे ) यांना ताब्यात घेतले. चाैकशीत ठाणे, नवी मुंबईतील घरफाेडीचे ४० गुन्हे उघडकीस आले. चाेरीसाठी वापरलेली कार आणि साेन्या चांदीचे दागिने असा ३९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.विजय जुन्नी विरुद्ध २० गुन्हे - विजयसिंगविरुद्ध मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, नवी मुंबई आणि अहिल्यानगरमधील पाेलीस ठाण्यांमध्ये चाेरीचे यापूर्वी २० गुन्हे दाखल आहेत. साेनूसिंग याच्याविरुद्ध पुण्याच्या देहूराेड आणि लाेणीकंदमध्ये चाेरीचे तीन तर खंडाळे याच्याविरुद्ध मुंबईतील टिळकनगर, पुण्यातील वालचंदनगर आणि यवत तसेच अहिल्यानगरमधील राहूरी पाेलीस ठाण्यात चाेरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. खंडाळे हा कार चालवायचा. तर इतर तिघे बंद घरे हेरुन चाेरी करायचे.

English
हिंदी सारांश
Web Title : Interstate Shikalgar gang arrested; stolen goods worth ₹39.53 lakhs seized.

Web Summary : Thane police arrested four members of an interstate Shikalgar gang involved in burglaries across Pune, Thane, and Ahilyanagar. They recovered ₹39.53 lakhs worth of stolen jewelry and property, solving 40 cases.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी