- जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे हॉटेल चालकांना व्यावसायिक वापराच्या सिलेंडर मिळविण्यात अडचणी येत असतांना ठाण्यातील सिनेवंडर मॉलमधील डॉमिनोज पिझ या खाद्य पदार्थ विक्रीच्या दुकानातून व्यावसायिक तसेच घरगुती १३८ गॅस सिलेंडरचा अवैध साठा जप्त केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी बुधवारी दिली. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.
ठाण्यातील सिनेवंडर मॉलमधील एका उपहारगृहात सिलेंडरचा अवैध साठा असल्याची माहिती ठाण्याच्या शीधा पुरवठा अधिकाºयांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे चितळसर पोलिसांसह पुरवठा विभागाने १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. याच छाप्यामध्ये भरलेले ५३ तर वापरुन संपलेले ८५ असे १३८ सिलेंडर आढळले. यामध्ये व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या अशा दोन्ही सिलेंडरचा समावेश आहे. हे सिलेंडर याठिकाणी कोणाकडून आणले जात होते? तसेच त्याचा अवैधपणे साठा कोणामुळे केला गेला? त्याची अवैध विक्री सुरु होती का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल वरुडे यांनी दिली.
Web Summary : Over 100 gas cylinders, both commercial and domestic, were seized from a Domino's Pizza outlet in Thane's Cine Wonder Mall. Authorities are investigating the illegal storage and supply chain, filing a case against those involved after a raid revealed the unauthorized stockpile.
Web Summary : ठाणे के सिने वंडर मॉल स्थित डोमिनोज पिज्जा से 100 से अधिक गैस सिलेंडर जब्त। वाणिज्यिक और घरेलू दोनों सिलेंडर शामिल। पुलिस अवैध भंडारण और आपूर्ति श्रृंखला की जांच कर रही है, और शामिल लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है।