शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 797 बाधितांसह सर्वाधिक 51 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 8:23 PM

 कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 471 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 10 हजार 351 तर, मृतांची संख्या 158 इतकी झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहे. त्यात बुधवारी दिवसभरात नवीन 1 हजार 797 बाधित रुग्णांची तर, 51 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 47 हजार 63 तर, मृतांची संख्या 1 हजार 404 झाली आहे.

   कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 471 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 10 हजार 351 तर, मृतांची संख्या 158 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 410 बाधितांची तर, 17 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 11 हजार 705 तर, मृतांची संख्या 449 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 207 रुग्णांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 8 हजार 279 तर, मृतांची संख्या 269 वर पोहोचला आहे. मीरा भाईंदरमध्ये 175 रुग्णांची तर, चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 808 तर, मृतांची संख्या 174 इतकी झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 95 बधीतांची तर, सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 532 तर, मृतांची संख्या 126 वर पोहोचली.

उल्हासनगर 172  रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 260 झाली आहे. अंबरनाथमध्ये 75 रुग्णांची तर, चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 378 तर, मृतांची संख्या 82 झाली आहे. बदलापूरमध्ये 85 रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 115 तर, मृतांची संख्या 19 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 107 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 592 तर, मृतांची संख्या 69 वर गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस