शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

नरेंद्र मेहतानंतर थरथरेलाही उच्च न्यायालयाचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 8:05 PM

२८ फेब्रुवारीच्या पहाटे भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादीनंतर पोलीसांनी मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केला होता.

मीरारोड - भाजपाचा माजी आमदार नरेंद्र मेहतासह त्याचा साथीदार संजय थरथरेवर दाखल बलात्कार व अ‍ॅट्रॉसीटीच्या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीण पोलीसांकडेच आहे. आरोपींना पकडण्यात सपशेल अपयश आल्याने पोलीसांची भुमिका संशयाच्या भोवरायात सापडली आहे. आरोपींशी पोलीसांचे हितसंबंध असल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे. १२ दिवसांपासुन पोलीसांना सापडत नसलेले सहआरोपी संजय थरथरे याला देखील आज बुधवारी उच्च न्यायालयाने अटकेपासुन दिलासा दिला. याआधी ५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने, मुख्य आरोपी मेहता तपासात सहकार्य करत असल्यास कठोर कारवाई करु नका असे आदेश देत दिलासा दिला होता.२८ फेब्रुवारीच्या पहाटे भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केला होता. परंतु ठाणे ग्रामीण पोलीसांना १२ दिवस उलटले तरी थरथरेचा ठाव ठिकाणा लागला नव्हता. मेहता देखील पोलीसांच्या हाती न लागता ५ मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर दिलासा मिळाल्याने शहरात वावरु लागला आहे. १२ दिवसांपासुन पोलीसांना न सापडलेला सह आरोपी थरथरे याने देखील उच्च न्यायालयात दाद मगीतली असता न्यायालयाने त्याला देखील अटके पासुन दिलासा दिला आहे. दुपारी न्यायालयाने दिलासा देणारा आदेश देताच काही तासातच थरथरे महापालिका मुख्यालयात उपमहापौर हसमुख गेहलोत, भाजपा जिल्हा हेमंत म्हात्रे आदिंसह दिसुन आला. त्यामुळे थरथरे जवळपास असुनही पोलीसांना सापडला नाही हे स्पष्ट झाले आहे.वास्तविक मेहता व थरथरे यांचे ठाणे ग्रामीण पोलीसांशी हितसंबंध आहेत. पोलीसांनी अनेक प्रकरणात आरोपींना पुर्वी देखील पाठीशी घालण्याचे काम केले आहे. तक्रारींची दखल न घेणे, तक्रार असताना गुन्हा दाखल न करणे, त्यांना अटक न करणे आदी अनेक प्रकारच्या तक्रारी व आरोप नागरिकांनी केलेल्याआहेत. ठाणे ग्रामीण पोलीसांच्या वरिष्ठ अधिकारायां सोबत आरोपींचे घनिष्ठ संबंध असल्याचे अधिकारायां सोबतच्या काही व्हायरल फोटों वरुन स्पष्ट झाले आहे. मेहता वर अनेक गुन्हे दाखल असुन देखील दोन दोन कार्बाईनधारी पोलीस बंदोबस्ताला दिलेले होते. या बाबतच्या तक्रारी देखील वरिष्ठ पोलीस अधिकारायां पासुन शासन स्तरावर झालेल्या असताना कार्यवाही केली गेली नाही.आरोपी हे भाजपा नगरसेवक प्रशांत दळवीची गाडी घेऊन फिरत असल्याचे एका जागरुक नागरिकाने काढलेल्या व्हिडिओमुळे पोलीसांना माहिती मिळाली होती. नंतर पोलीसांनी दळवी यांची आलिशान एमएच ०४ जेजे ५२५२ क्रमांकाची गाडी जप्त करुन पोलीस ठाण्या बाहेर आणुन ठेवली आहे. गुन्हा दाखल केल्या नंतर पिडीत नगरसेविकेला भ्रमणध्वनी वरुन धमक्या आल्याने त्याचा सुध्दा गुन्हा मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. शासना कडुन सदर गुन्ह्याचा तपास ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुनहे शाखेचे उपायुक्त यांच्या कडे देण्याचे जाहिर केले असले तरी अजुनही अधिकृत पत्र आले नसल्याने तपास ठाणे ग्रामीण पोलीसां कडेच आहे. पण आरोपीची पोलीसांनी अजुनही चौकशी सुरु केलेली नसल्याचे सुत्रांनी सांगीतले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिसBJPभाजपा