शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ; १२ घरांचे नुकसान, शेकडो गावांचा संपर्क तुटला! कुलाब्यात १०३ मिमी नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 10:28 IST

मुंबईसह ठाणे जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर संततधार होती.

ठाणे/मुंबई :  मुंबईसहठाणे जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर संततधार होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत धाले. विविध तालुक्यांमध्ये १२ घरांचे नुकसान झाले. तर शहापूर तालुक्यातील सापगाव येथे भातसा नदीच्या पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे एका कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले.      

संततधारामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे साडेतीन मीटरने उघडले असून, शेकडो लीटर पाणी भातसा नदीपात्रात सोडले आहे. यामुळे नदीला महापूर आला असून, तालुक्यातील सुमारे १२० गावांचा संपर्क तुटला. सापगाव, डोळखांब, किन्हवली, शेणवा व सोंडे परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी  बंद केले आहेत. विशेषतः डोळखांब-सोंडे मार्ग आणि डोळखांब पुलावरून वाहतूक पूर्णतः बंद केली असून रायते पुलावरून उल्हास नदीच्या पुराचे पाणी वाहत असल्यामुळे कल्याण ते नगर महामार्ग बंद केला आहे.      

कुलाब्यात १०३ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्याच्या सूचना मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या.

वीज पडल्याने ५ जखमीपालघर जिल्ह्यातील नदी, ओहोळ, धरणे भरून वाहत आहेत. अनेक पूल, रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती. मासवण येथे एका घरावर वीज पडल्याने ५ जण जखमी झाले. याशिवाय झाडे कोसळून घरांची पडझड झाली. तसचे शेतीचे नुकसान झाले आहे.

आठव्यांदा तीन नंबरचा बावटा; जलवाहतूक पुन्हा कोलमडलीउरण : वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांत सलग आठव्यांदा बंदरात  धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मासेमारीसह गेटवे-एलिफंटा, गेटवे-जेएनपीए, गेटवे-मांडवा, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस ही प्रवासी जलवाहतूक शनिवारपासूनच (ता. २७) पुन्हा एकदा ठप्प झाली असून, मच्छीमारांनी आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली आहे. करंजा बंदरातील सुमारे ४०० बोटींनी नांगर टाकल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली. खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया-एलिफंटा, गेटवे-जेएनपीए,  गेटवे-मांडवा सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शनिवारपासूनच बंद केल्याचे  गेटवे मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव इक्बाल मुकादम यांनी सांगितले. तर, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवसदरम्यानची सागरी प्रवासी वाहतूकही शनिवारपासूनच बंद करण्यात आली असल्याची माहिती भाऊचा धक्का येथील बंदर विभागाचे निरीक्षक सुशील साटेलकर यांनी दिली. 

भातसा नदीला आला पूर; ग्रामस्थांना आवाहनभातसा नदीला पूर आल्यामुळे सापगावजवळ नदीने २०० मीटर पातळी गाठल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. सापगाव येथे आ. दौलत दरोडा यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी नागरिकांना दिलासा देताना, ‘कोणालाही निवास समस्या असल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा,’ असे आवाहन केले. 

एक जण गेला वाहूनठाणे जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी किंवा पशुधनाचे नुकसान झाल्याची नोंद नाही. बदलापूरमध्ये शनिवारी रात्री एक व्यक्ती वाहून गेला. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी तरुण वाहून गेल्याचे सांगितले. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

दर्ग्यात अडकले १० भाविक सकाळपासून सुरू असलेल्या पावसात कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. चारही बाजूंनी पाण्याने वेढल्याने दर्ग्यात दहा भाविक अडकले. या घटनेची माहिती समजताच  अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. 

सहा ठिकाणी शॉर्टसर्किटजोरदार पर्जन्यवृष्टीमुळे अंधेरी सबवे येथे काळ वेळासाठी पाणी साचले होते.  शहरात १, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा ६ ठिकाणी फांद्या, झाडे पडण्याच्या तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या, तर सहा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

नदींना पूर; वाहतूक ठप्पशहापूर आणि मुरबाड तालुक्यांत नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामध्ये शहापूर-किन्हवली-मुरबाड-डोळखांब रस्ता, मुरबाड-धसई-शिरपूर रस्ता, मुरबाड-घोरले रस्ता यांचा समावेश आहे.

पर्जन्य जलवाहिन्यांवर लक्षपर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून पाण्याचा निचरा हाेण्यात अडथळा येऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून तत्परतेने कार्यवाही करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rain Lashes Thane: Homes Damaged, Villages Isolated, Life Disrupted

Web Summary : Thane and Mumbai experienced heavy rainfall, damaging homes and disrupting life. Bhatsa River flooded, cutting off villages. Kolhapur recorded 103mm of rain. Five injured by lightning in Palghar. Ferry services halted due to storm warnings. Authorities are on alert.
टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईthaneठाणे