शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेविका मयेकर यांच्या जातप्रमाणपत्रावर सुनावणी

By admin | Updated: January 20, 2016 01:51 IST

भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका सरस्वती रजनीकांत मयेकर यांनी खोटे जातप्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश देणाऱ्या

भार्इंदर : भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका सरस्वती रजनीकांत मयेकर यांनी खोटे जातप्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश देणाऱ्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने येत्या ५ फेब्रुवारी रोजी फेरसुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. समितीच्या निर्णयाविरुद्ध मयेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अलीकडेच समितीस फेरसुनावणी घेण्याचे आदेश दिले.आॅगस्ट २०१२ मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ४ मधून सरस्वती मयेकर भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या. तेथील उमेदवारीसाठी त्यांनी इतर मागासवर्गातील मच्छीमार दालदी या जातीचे प्रमाणपत्र कोकण विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केले होते. समितीने त्यांचे जातप्रमाणपत्र वैध ठरवत त्यांना १२ जुलै २०१२ रोजी वैधता प्रमाणपत्र दिले. जातपडताळणीवेळी मयेकर यांनी मुसलमान सुुन्नी जातीचा उल्लेख असलेल्या वडिलांच्या शाळेचा दाखला सादर केला होता. विवाहापूर्वी मयेकर या मुस्लिम समाजाच्या होत्या. त्या वेळी त्यांचे नाव फरजाना अलिमिया शेगले, असे होते. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मच्छीमार दालदी या जातीनुसार मयेकर यांनी आपल्या वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय उमेदवारी अर्जात नमूद केल्याने राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार नर्मदा वैती यांनी त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात २०१२ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर १४ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सदर चौकशी कोकण विभागीय जातप्रमाणपत्र समितीपुढे घेण्याचे निर्देश दिले होते. समितीने केलेल्या चौकशीत मयेकर यांनी सादर केलेल्या वडिलांच्या दाखल्यात नमूद केलेली जात मुसलमान सुन्नी असतानाही उमेदवारी अर्जात मच्छीमार दालदी ही इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जात नमूद केली. त्यामुळे खोटी माहिती दिल्याचे सांगत जात प्रमाणपत्र रद्द ठरविले होते. (प्रतिनिधी)