शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात President Cup India 2026” टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांची विशेष उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 21:43 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांची विशेष उपस्थिती !

ठाणे 
  

टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “President Cup India - 2026” या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ येत्या ३१ मार्च २०२६ रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याला अधिकच आकर्षण प्राप्त होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, ते टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे.

आयटीसीएसएफच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे. येत्या ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यांतील १६ संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, मोठ्या संख्येने खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. ‘President Cup India’ स्पर्धेची बक्षीस रक्कम ४० लाखांवरून थेट १ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय आयटीसीएसएफने घेतला आहे. 

या स्पर्धेत महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायराइट्स, बिहार ब्लास्टर्स, दिल्ली स्ट्राइकर्स, ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग्स, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स (वेस्ट बंगाल), मध्य प्रदेश टायगर्स, पूर्वांचल पँथर्स, राजस्थानी योद्धाज, रॉयल चॅलेंजर्स गोवा, सुप्रीम सुपर किंग्स (तमिळनाडू), यूपी नाइट्स आणि उत्तराखंड टायगर्स असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून, स्पर्धेत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत.

टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून, ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसेच मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित राहणार असून, प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

स्पर्धेत प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी आकर्षक बक्षिसांचीही मेजवानी ठेवण्यात आली आहे. दररोज भाग्यवान प्रेक्षकांना दुचाकी तसेच हजारो रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष सन्मान देण्यात येणार असून ‘Player of the Series’ विजेत्याला Mahindra Thar ही कार प्रदान करण्यात येणार आहे, तर ‘Best Player’ ला दुचाकी दिली जाणार आहे. तसेच स्पर्धेदरम्यान विविध विशेष पारितोषिके आणि सरप्राईज गिफ्ट्सही दिली जाणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : President Cup India 2026: Grand launch in Thane with Salman!

Web Summary : Thane to host President Cup India 2026 tennis cricket tournament. Inauguration by Deputy CM Eknath Shinde and Salman Khan. Sixteen teams will participate for a ₹1 crore prize.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSalman Khanसलमान खान