शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरच होतात अंत्यसंस्कार; रायते, वावेघरच्या ग्रामस्थांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:54 IST

जागेअभावी निधी गेला परत

टिटवाळा : स्मशानभूमी बांधण्यासाठी आलेला निधी जागेअभावी चार वेळा परत गेल्यामुळे कल्याण तालुक्यातील रायते, वावेघर आणि नवगाव येथील ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार पार पाडावे लागत आहेत. पावसाळ्यात तर ग्रामस्थांची अवस्था बिकट होत आहे. तिन्ही गावांसाठी स्मशानभूमी बांधण्याचा लाखोंचा निधी आला होता. मात्र, ग्रामस्थांमधील मतभेदांमुळे त्यासाठी जागाच उपलब्ध न झाल्यामुळे तो चारवेळा परत पाठवण्याची नामुश्की ओढवली.रायते या गावातील पोलीस पाटील स्वप्नील पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उल्हास नदीच्या तीरावर रायते पुलाच्या बाजूला उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागले. कल्याण-मुरबाड महामार्गाच्या शेजारी आणि उल्हास नदीच्या काठावर रायते हे गाव आहे. तर कल्याण-कसारा रेल्वे मार्गालगत खंडवली ग्रामपंचायत हद्दीतील वावेघर हे गाव आहे. नवगाव हे बापसाई ग्रामपंचायत हद्दीत येते. स्मशानभूमीसाठी जागाच मिळत नाही. सरकारी भूखंडावर स्मशानभूमी बांधायला घेतली तर ग्रामस्थच हरकती घेतात. आता कायदेशीर मार्गाने शासनाकडे जागा मागितली आहे.हे काम शेवटच्या टप्प्यात असून दोन-तीन महिन्यांपासून फाइल पंचायत समितीत अडकली असल्याचे रायतेचे सरपंच पद्मश्री जाधव यांनी सांगितले.कल्याण तालुक्यातील रायते, वावेघर आणि नवगाव या तिन्ही गावांतील स्मशानभूमीसाठी शासनाकडून प्रत्येकी २० लाख रु पये निधी मंजूर करून दिला. मात्र, ग्रामस्थ जागा उपलब्ध करून देत नसल्याने हा निधी चार वेळा परत गेला आहे.- किसन कथोरे, आमदार