पॅरोलवरील फरार कैदी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST2021-06-11T04:27:41+5:302021-06-11T04:27:41+5:30

डोंबिवली : दरोड्याच्या गुन्ह्यात सुरत येथील लाजपोर कारागृहात सात वर्षांची शिक्षा भोगणारा आणि पॅरोलवर सुटल्यावर पसार झालेल्या महेश उर्फ ...

Fugitive prisoner released on parole | पॅरोलवरील फरार कैदी गजाआड

पॅरोलवरील फरार कैदी गजाआड

डोंबिवली : दरोड्याच्या गुन्ह्यात सुरत येथील लाजपोर कारागृहात सात वर्षांची शिक्षा भोगणारा आणि पॅरोलवर सुटल्यावर पसार झालेल्या महेश उर्फ भुऱ्या रमेशभाई चंदनशिवे याला रामनगर पोलिसांनी सापळा लावून बुधवारी अटक केली.

डोंबिवली पूर्वेकडील आयरेगाव ज्योतीनगरमध्ये राहणाऱ्या महेशला गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील डोंगरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात सात वर्षांची कैद तेथील सत्र न्यायालयाने २५ ऑगस्ट २०२० रोजी सुनावली. ही शिक्षा भोगत असलेल्या महेशला गुजरात येथील गांधीनगरमधील उच्च न्यायालयाने १२ एप्रिल २०२१ पासून १४ दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. पॅरोलची मुदत २१ एप्रिलला संपली तरी तो कारागृहात हजर झाला नाही. याची माहीती लाजपोर कारागृहातील अधिकारी कुंदनसिंग धारगे यांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर महेशला अटक करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या पथकाला महेशला अटक करण्यात यश आले आहे. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

-------------------

Web Title: Fugitive prisoner released on parole