शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीला चिंता अस्तित्वाची

By admin | Updated: October 14, 2015 02:43 IST

केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाने अघोषित काडीमोड घेतला असल्याने स्वतंत्ररित्या मंगळवारी अर्ज भरले. आधी नको नको म्हणणाऱ्या भाजपासह आघाडीने संघर्ष समितीच्या माध्यमातून

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाने अघोषित काडीमोड घेतला असल्याने स्वतंत्ररित्या मंगळवारी अर्ज भरले. आधी नको नको म्हणणाऱ्या भाजपासह आघाडीने संघर्ष समितीच्या माध्यमातून तर सेनेने स्वतंत्ररित्या २७ गावांंमधून फॉर्म भरल्याने अखेर ही निवडणूक सर्वच्या सर्व १२२ जागांसाठी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत खऱ्या अर्थाने सेना-भाजपातच बिग फाइट होणार असल्याचे चित्र आहे.युती संदर्भातील सर्व चर्चा फोल ठरल्याने शिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले, तर भाजपानेही कल्याणमध्ये तसेच काहींच्या घरी जाऊन त्याचे वाटप केले. त्यामुळे कल्याणसह डोंबिवलीतील फॉर्म स्वीकारण्याच्या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीण भागातील २७ गावांमधून येणाऱ्या अर्जदारांसाठी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्ससह अन्य सुरक्षायंत्रणेचा फौजफाटा तैनात करण्यात केला होता. सर्वच ठिकाणच्या अर्ज स्वीकारण्याच्या केंद्रांवर सेना-भाजपाचे उमेदवार आले की, त्यांचे समर्थक मोठ्याने घोषणा देत होते, त्यामुळे काही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणेवरचा ताण वाढला होता. अखेरीस दुपारी अत्यंत शांततेच्या वातावरणात अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पार पडली. युती नाही असे समजूनच दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यामुळे आगामी १५ दिवस अधिक तणावाचे असतील. विशेषत: जेथे सेना-भाजपाचे उमेदवारांचे तुल्यबळ समसमान आहे तेथे विशेष वॉच ठेवावा लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाने खासगी फौज उभी करण्यासाठी व्यायाम शाळेच्या युवकांना तर सेनेच्या वतीने नाशिकमधील काहींना येथे बोलावले आहे. त्यामुळे येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.आघाडीमध्येही सध्या तरी उत्साहाचे वातावरण असून सेना-भाजपाच्या भांडणाचा लाभ कसा उठवता येइल, याकडे मनसेचे लक्ष आहे. त्यातच २७ गावांमधील संघर्ष समिती यापुढे नेमके काय पाऊल उचलते हे महत्त्वाचे आहे. काँग्रेसला कान्होजी जेधे मैदान, गावदेवी, इंदितानगर, आयरेरोड, दत्तनगर या भागातून अपेक्षा आहेत. शिवसेनेचे पश्चिमेला मोठागाव-ठाकुर्ली, आनंदनहर, महाराष्ट्रनगर, कोपर रोड, सखाराम कॉम्प्लेक्स यासह पूर्वेला संगितावाडी, दत्तनगर, सारस्वत कॉलनी, आदी भागात अपेक्षा आहेत. अशाच पद्धतीने कल्याण पूर्वेत आणि पश्चिमेतही प्रत्येक पक्षांचे पॉकेट असून तेथून संबंधितांचे उमेदवार निवडून येतील असा दावा करण्यात येत आहे.कल्याण ग्रामीणमध्ये नेमके कोण बाजी मारते त्यावरच पक्षाचा महापौर कोण असू शकतो हे चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेने तेथून सर्व जागांवर फॉर्म भरल्याने अन्य पक्षांनीही फॉर्म भरले. आघाडीने मात्र संघर्ष समितीवर निर्णय सोपवल्याने त्या पक्षाकडून तेथून अर्ज भरले की नाही हे स्पष्ट नाही.