शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका उभारणार चिमण्यांसाठी खाद्यघरटी

By admin | Updated: March 21, 2017 01:48 IST

सर्वच ठिकाणी काँक्रिटचे जंगल उभे राहू लागल्याने शहरातील वन्यजीवही कमी होऊ लागले आहेत. त्यात चिमण्या तर दिसेनाशा

ठाणे : सर्वच ठिकाणी काँक्रिटचे जंगल उभे राहू लागल्याने शहरातील वन्यजीवही कमी होऊ लागले आहेत. त्यात चिमण्या तर दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळेच आता ‘चिमणी बचावा’साठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला असून महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलाव परिसरातील झाडांवर खाद्याची भांडी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बांधली आहेत. हा उपक्रम संपूर्ण शहरात राबवला जावा, यासाठी अर्थसंकल्पात पाच लाखांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी आयुक्तांनी दिली. ठाण्यात काँक्रिटीकरणाचे प्रमाण वाढू लागल्याने पक्षांचे अस्तित्वदेखील धोक्यात येऊ लागले आहे. त्यातही चिमण्या नाहीशा होऊ लागल्या आहेत. अनेक सामाजिक संस्थांकडून चिमणी बचावासाठी पावले उचलण्यात आली आहेत. शहरात अशाच प्रकारे कार्यरत असलेल्या ठाणे सिटीझन फोरमच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून ‘चिमणी वाचवा’ अभियान राबवले जात आहे. यात वर्तकनगर भागातील लक्ष्मी रेसिडेन्सी, नीलकंठ तसेच आसपासच्या गृहसंकुलांमध्ये चिमणी व अन्य पक्षांकरिता आतापर्यंत ४०० हून अधिक खाद्याची भांडी बसवण्यात आली आहेत. या उपक्रमानंतर या संस्थेने महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात हे अभियान राबवण्याचा निर्धार केला आहे. सोमवारी जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून या अभियानाची सुरुवात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली. कचराळी तलाव आणि पालिका मुख्यालयातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील झाडांवर चिमणी व अन्य पक्ष्यांकरिता खाद्याची भांडी बसवण्यात आली. आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन ही भांडी या झाडांवर बांधली. (प्रतिनिधी)