अंबरनाथ - बदलापुरात आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. दोन गटातल्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गोळीबारात अल्ताफ शेख हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल्ताफ शेख याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बदलापूर गावात आमदारांचा निवासस्थान आहे. त्यांच्या घरासमोरूनच बोराटपाडा - मुरबाडकडे रस्ता जातो. याच रस्त्यावर हा गोळीबार झाला. पूर्वीच्या वादातूनच ही घटना घडली असून बदलापुरातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नामचीन गुंडांचे देखील या प्रकरणात नाव समोर येण्याची शक्यता आहे.