ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथील सहा दुकानाना आग; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 11:16 IST2020-10-02T11:15:30+5:302020-10-02T11:16:45+5:30

Fire broke out at Arcadia Shopping Center : आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने धाव घेतली.

Fire broke out at six shops at Hiranandani Estate in Thane; Loss of millions | ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथील सहा दुकानाना आग; लाखोंचे नुकसान

ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथील सहा दुकानाना आग; लाखोंचे नुकसान

ठाणे:ठाण्यात पातलीपाडा हिरानंदानी इस्टेट येथील अरकेडीया  शॉपिंग सेंटर मधील एक मेडिकल दुकाना सह सहा दुकानाना शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास  आग  लागल्याची घटना घडली. या आगीत वेलनेस मेडिकल, प्राइम हार्डवेअर, रेनबो शॉपी, सिटी वाइन्स आणि गौरव स्वीट्स आशा सहा दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.




आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने धाव घेतली. घटनास्थळी तीन फायर इंजिन आणि तीन वॉटर टँकर च्या मदतीने अद्यापही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Fire broke out at six shops at Hiranandani Estate in Thane; Loss of millions