शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकांचेच अखेर राजकीय पुनर्वसन

By admin | Updated: February 11, 2016 02:44 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांच्या बुधवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत पाच माजी नगरसेवकांचीच वर्णी लावण्यात आली. अशासकीय संघटनांचा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांच्या बुधवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत पाच माजी नगरसेवकांचीच वर्णी लावण्यात आली. अशासकीय संघटनांचा आधार घेत त्यांनी महापालिकेत चंचुप्रवेश केला आहे.एकूण पाच जागांकरिता ८ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी तिघांचे अर्ज अवैध ठरले. निवड झालेल्या ५ सदस्यांमध्ये विश्वनाथ राणे, प्रभुनाथ भोईर(शिवसेना), राजन सामंत, अभिमन्यू गायकवाड (भाजपा) आणि पवन भोसले (मनसे) यांचा समावेश आहे. पाच वर्षांकरिता स्वीकृतपदी निवड झाल्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली. निवड झालेले सर्व सदस्य हे माजी नगरसेवक असल्याने स्वीकृतपदावर झालेली त्यांची निवड हे एक प्रकारे त्यांचे ‘राजकीय पुनर्वसन’ असल्याची चर्चा आहे.बुधवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत छाननीदरम्यान शिवसेनेचे संजय पावशे, जनार्दन म्हात्रे या दोघांचे अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्याने अवैध ठरविण्यात आले तर, पुरेसे संख्याबळ नसतानाही उमेदवारी दाखल करणारे राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. गणेश घोलप यांचाही अर्ज बाद ठरविण्यात आला. कल्याण-डोंबिवलीत अनेक नामांकित डॉक्टर, वकील, निवृत्त प्रशासकीय अधिकारी उपलब्ध असताना शिवसेना, भाजपा आणि मनसे यांनी आपल्या माजी नगरसेवकांच्या ‘अशासकीय संघटनेचा पदाधिकारी’ असण्याचा आधार घेत त्यांची राजकीय सोय लावली आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार घोलप यांनी निवड प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला असल्याने या सदस्यांच्या निवडीवर त्याचे सावट राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)केडीएमसीत विश्वनाथ राणे यांची स्वीकृतपदी निवड झाली. त्यांची पत्नी विनिता राणे या यापूर्वीच लोकांमधून निवडून आलेल्या आहेत. राणे पती-पत्नीच्या महापालिका प्रवेशामुळे महासभेतील हे सातवे मेहुण असेल. सध्या या महापालिकेत विकास म्हात्रे व कविता म्हात्रे, प्रकाश भोईर व सरोज भोईर, शैलेश धात्रक व मनीषा धात्रक, रमेश म्हात्रे व गुलाब म्हात्रे, राजेश मोरे व भारती मोरे, उपमहापौर विक्रम तरे व मोनाली तरे ही सहा जोडपी आहेत. राणेंच्या प्रवेशाने ही संख्या सात झाली आहे. स्वीकृतपदी निवड झालेले राणे व राजन सामंत यांची अनुभवी आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख राहिली आहे.