कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरून वडील-मुलाची तरूणाला मारहाण, तरूणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 15:13 IST2017-11-23T15:12:05+5:302017-11-23T15:13:50+5:30
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून बापासह अल्पवयीन मुलाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पुर्वेकडील सूचक नाका परिसरात घडली आहे .

कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरून वडील-मुलाची तरूणाला मारहाण, तरूणाचा मृत्यू
कल्याण- क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून बापासह अल्पवयीन मुलाने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पुर्वेकडील सूचक नाका परिसरात घडली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी कलिम शेखला अटक करत त्याच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. वडील व मुलाच्या मारहाणीत आफताब आलम या तरूणाचा मृत्यू झाला आहे.
कल्याण पुर्वेकडील सूचक नाका परिसरात राहणारा आफताब आलम याचं त्याच परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलांबरोबर भांडण झालं होतं. ही बाब या मुलाचे वडील कलिम शेख यांना समजताच त्यांनी आफताबला जाब विचारण्यासाठी काल रात्री आफताबला गाठलं. यावेळी दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादामुळे संतापलेल्या कलिम शेख आणि त्यांचा १६ वर्षाचा मुलगा याने आफताबला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आफताबच्या गुप्तांगाला फटका लागल्याने आफताबचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून कलिम शेखला अटक करत त्याच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे .या घटनेमुळे कल्याण पूर्वेत एकच खळबळ उडाली आहे.