शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

भाईंदरमध्ये हॉटेलात भीषण स्फोट; हॉटेलसह आजूबाजूच्या दुकानांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 2:23 AM

सहाव्या मजल्यापर्यंतच्या खिडक्या फुटल्या

मीरा रोड : भाईंदरच्या मॅक्सस मॉललगतच्या इमारतीतील एका हॉटेलमध्ये बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटाने एकच खळबळ उडाली. हॉटेलच्या दोन्ही बाजूंकडील दुकानांच्या भिंती या स्फोटामुळे जमीनदोस्त झाल्या. मोटारकार फेकली गेली, तर सहाव्या मजल्यापर्यंतच्या खिडक्यांच्या काचा फुटण्याएवढी तीव्रता या स्फोटाची होती. मध्यरात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे अग्निशमन दलाने सांगितले असले तरी, पोलिसांनी मात्र काही दुसरी स्फोटके होती का, याचाही तपास चालवला आहे.

या इमारतीच्या तळमजल्यावरील गाळा क्र. १० मध्ये इटालिओ नावाचे पिझ्झा आदी खाद्यपदार्र्थांचे फास्टफूड सेंटर आहे. बुधवारी रात्री कर्मचारी साफसफाई करून निघून गेले. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास या हॉटेलमध्ये जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज आणि हादरे एवढे तीव्र होते की, हॉटेलचे शटर तुटून पडले. आतील सामान तसेच पोटमजल्यावरच्या सामानाचेही नुकसान झाले. हॉटेलच्या दोन्ही बाजूंच्या ९ आणि ११ क्रमांकांच्या गाळ्याच्या भिंती फुटून त्यांचे शटरही निखळले. ९ क्रमांकाच्या गाळ्यात सलून, तर ११ क्रमांकाच्या गाळ्यात जिम चालवले जाते. हॉटेलसमोरची कार या स्फोटामुळे काही फूट मागे ढकलली जाऊन तिच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले.

बॉम्बशोधक पथकासहएटीएसने केली पाहणी

भाईंदरच्या मॅक्सस मॉललगतच्या इमारतीतील हॉटेलमध्ये बुधवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका कारच्या काचा, तसेच बँक ऑफ इंडियाच्या एटीएमच्या काचाही फुटल्या. हॉटेलवर पहिल्या मजल्यावर असलेल्या पोद्दार प्ले ग्रुपच्या लाद्या उचकटल्या. अगदी सहाव्या मजल्यापर्यंतच्या सदनिकांच्या खिडक्यांच्या काचा या स्फोटाने फुटल्या. समोरच्या मॅक्सस मॉलच्या चौथ्या मजल्यावरील हॉटेलच्या काचासुद्धा फुटल्या.

इमारतीचा रखवालदार ऋषीकुमार त्रिपाठी याला किरकोळ दुखापत झाली असून, एका भटक्या श्वानाच्या पायाला मार लागला आहे. स्फोटाच्या आवाजाने इमारतीतील तसेच आजूबाजूच्या इमारतींतील रहिवासी भयभीत होऊन, त्यांनी इमारतीबाहेर धाव घेतली. भाईंदर पोलीस आणि अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक शशिकांत भोसले, भाईंदरचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्फोटामुळे झालेली हानी पाहून दोन्ही बाजंूकडील रस्ता बंद केला.

अग्निशमन दलाने आत जाऊन आधी हॉटेलात असलेले पाच गॅस सिलिंडर बाहेर काढले. यातील एका सिलिंडरमधून गळती सुरू होती. ती त्वरित बंद केली. पाचपैकी दोन सिलिंडर गॅसने भरलेले, तर दोन रिकामे होते. एक सिलिंडर अर्धवट रिकामा होता. पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकासह एटीएस, एसआयडी आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.स्फोटाची तीव्रता खूप जास्त होती. पण, कुठे आग लागली नाही. 

हॉटेलमधील एक गॅस सिलिंडर उघडा होता. त्यातून गळती सुरू होती. शटर बंद असल्याने आत गॅसचा प्रचंड दाब तयार होऊन स्फोट झाल्याची शक्यता आहे. याआधी मीरा रोडच्या कनकिया भागातील एका हॉटेलात अशाच प्रकारे स्फोट झाला होता. पण, या स्फोटाच्या तुलनेत त्याची तीव्रता खूप कमी होती.-सदानंद पाटील, अग्निशमन दल अधिकारी

अग्निशमन दलाने गॅसगळती किंवा कॉम्प्रेसरगळतीमुळे स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. परंतु, पोलिसांनी घटनास्थळाचे नमुने तपासासाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर स्फोटके होती की आणखी काही, हे स्पष्ट होईल.- चंद्रकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक, भाईंदर पोलीस

स्फोटाचा आवाज व हादरा इतका तीव्र होता, की आम्हीदेखील हादरलो. माझ्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या. काय झाले हे पाहण्यासाठी लगेच खाली धावत गेलो. पाहिले तर पिझ्झा हॉटेलसह आजूबाजूचे दोन गाळे, कार यांचे मोठे नुकसान झाले होते.- मिलिंद रकवी, दुर्घटनाग्रस्त इमारतीचे रहिवासी

...तर जीवितहानी झाली असती 

मॅक्सस मॉललगतच्या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. वाहनेसुद्धा येथेच उभी केली जातात. रात्री उशिरापर्यंत येथे रेलचेल असते. चित्रपट सुटला की, लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. पण, स्फोट मध्यरात्रीनंतर झाला आणि त्यादरम्यान चित्रपट सुटला नव्हता, हे सुदैव. अन्यथा, जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती.

 

टॅग्स :Bombsस्फोटकेMira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणेPoliceपोलिस