शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांवर खर्च

By admin | Updated: February 23, 2017 05:45 IST

कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे करवाढीला बगल देण्यात आली आहे.

बदलापूर : कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे करवाढीला बगल देण्यात आली आहे. मात्र जुन्याच प्रकल्पासाठी पुन्हा आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. हे प्रकल्प कधी पूर्ण होणार त्याचा उल्लेख मात्र केलेला नाही. बाह्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर अथर्संकल्पात सर्वाधिक भर देण्यात आला आहे. करवाढ नसलेला बदलापूरचा ९ लाख ४९ हजारांचा शिलकी अथर्संकल्प बुधवारी सभागृहात सादर करण्यात आला. ५३८ कोटी ७९ लाखांच्या या अर्थसंकल्पात उत्पन्नापेक्षा अनुदानावर सर्वाधिक भर आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, बाह्यवळण रस्त्यांचे कॉंक्रि टीकरण आदी नवीन तरतुदींबरोबरच बोटॅनिकल गार्डन, स्टेडियम, नाट्यगृह आणि प्रशासकीय इमारत या जुन्याच घोषणांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. याच प्रकल्पांवर आधीही तरतुद केली होती. मात्र त्या प्रकल्पांचे काम सुरु न झाल्याने यावर्षी त्याच प्रकल्पांवर पुन्हा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी अथर्संकल्प मांडला. यावेळी उपनगराध्यक्ष शरद तेली, भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आशिष दामले व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या वर्षी नव्याने भांडवली मूल्यावर आधारित कररचना केल्याने मालमत्ता कराचे उत्पन्न १० कोटींनी वाढले होते. त्यात साधारणत: २४ हजार नव्या मालमत्तांचा समावेश झाल्याने यंदा कोणत्याही नव्या कराची वाढ करण्यात आलेली नाही. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी तीन कोटी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील प्रवेशद्वारांवर कमानी लावून सुशोभीकरणावर दीड कोटी, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी दीड कोटींची तरतूद आहे. वालीवली भागात बोटॅनिकल गार्डनचे आश्वासनही देण्यात आले आहे. नगरोत्थानासाठी ११० कोटी, बाह्यवळण रस्त्यांसाठी १०० कोटींची तरतूद केली आहे. नाट्यगृहाचे पुन्हा आश्वासन दिले असून त्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सभेच्या सुरु वातीला भाजपाचे संजय भोईर यांनी आक्षेप घेतला. हा अर्थसंकल्प आधी स्थायी समितीत मंजूर करणे अपेक्षित असताना तो सर्वसाधारण सभेत मांडून प्रथा मोडण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला. आचारसंहितेमुळे सभा घेण्यास उशीर झाल्याचे नगराध्यक्ष म्हात्रे यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)