आज संध्याकाळी ठरेल प्रिन्सेस आॅफ ठाणेकर

By Admin | Updated: October 12, 2016 04:42 IST2016-10-12T04:42:53+5:302016-10-12T04:42:53+5:30

लोकमत युवा नेक्स्ट आणि एलटीए आयोजित प्रिन्सेस आॅफ ठाणेकर स्पर्धेची उत्कंठा वाढलेली असून अंतिम सोहळा उद्या (१२ आॅक्टोबर) सायंकाळी ६ वाजता कोरम मॉल

This evening, will be the Princess of Thanekar | आज संध्याकाळी ठरेल प्रिन्सेस आॅफ ठाणेकर

आज संध्याकाळी ठरेल प्रिन्सेस आॅफ ठाणेकर

ठाणे : लोकमत युवा नेक्स्ट आणि एलटीए आयोजित प्रिन्सेस आॅफ ठाणेकर स्पर्धेची उत्कंठा वाढलेली असून अंतिम सोहळा उद्या (१२ आॅक्टोबर) सायंकाळी ६ वाजता कोरम मॉल, ठाणे (प.) येथे रंगणार आहे. उदंड प्रतिसादात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत १६ स्पर्धक आहेत.
व्यक्तिमत्त्व, सौंदर्य, बुद्धिमत्ता या विविध प्रकारातील गुणवत्तेवरून प्रिन्सेस आॅफ ठाणेकर विजेती निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम फेरी स्वओळख आणि द्वितीय फेरी प्रश्नोत्तराची असणार आहे. जश्न आणि फ्युजन बीटस् हे कार्यक्रमाचे स्टाईल पार्टनर असणार आहेत.
कार्यक्रमाला कोरम मॉल, ठाणे, हॅथवे केबल, केबल इन, जश्न, फ्युजन बीटस्, वूड क्राफ्ट यांचे सहकार्य लाभले आहे. सौंदर्य स्पर्धेतील विजेतीला एलटीएची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर बनण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: This evening, will be the Princess of Thanekar