शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांना भावपूर्ण निरोप

By admin | Updated: September 29, 2015 01:18 IST

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष आणि ढोलताशांच्या गजरात रविवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायास निरोप दिला. गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा

ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष आणि ढोलताशांच्या गजरात रविवारी भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायास निरोप दिला. गेले दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी जिल्हाभरातील विविध विसर्जनस्थळांवर सुमारे ३१ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. ‘काहीतरी कर ठाणेकर...’ या टॅगलाइनच्या आधारावर लोकमतने राबविलेल्या विशेष मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अनेक भक्तांनी गोंगाटासह आवाजाचे प्रदूषण न करता आणि विसर्जनस्थळी विशेष स्वच्छता राखून तलावांचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मदत केलीच, शिवाय इतरांनाही त्यापासून परावृत्त केले. लोकमतच्या या मोहिमेचे सर्वांनीच स्वागत केले. याअंतर्गत संपूर्ण उत्सवकाळात अनेक सोसायट्यांतील रहिवाशांनी आवाजाचे प्रदूषण न करता शांततेत गणेशाचे स्वागत केले. तसेच निरोपही शांततेत दिला. शिवाय, विसर्जनस्थळावर पर्यावरणाचे भान राखून इको-फ्रेण्डली बाप्पाची संकल्पना खऱ्या अर्थाने राबविली. मासुंदा तलावाच्या ठिकाणी लोकमतच्या स्वयंसेवकांकडून काहीतरी कर ठाणेकर... या संकल्पनेची अधिक माहिती जाणून घेऊन सहभाग दर्शविला तसेच फेसबुक पेजसह लोकमतच्या आगामी उपक्रमातही तनमनाने सहभागाची ग्वाही दिली.विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस यंत्रणेने चोख कामगिरी पार पाडली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ५०२ सार्वजनिक तर ५ हजार ७४९ घरगुती, तर ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये ६६६ सार्वजनिक आणि २४ हजार ६६ घरगुती बाप्पांना साश्रुनयनांनी निरोप दिला.ठाणे, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी इको-फ्रेण्डली गणेशोत्सव संकल्पना राबवून गणेशमूर्ती विसर्जनाकरिता विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. त्या ठिकाणीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ---ठामपाने गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था केली. यामध्ये रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनीवाडी) येथे कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. मासुंदा तलाव येथील दत्तघाट आणि अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व पर्यायी व्यवस्था केली होती. पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत, कोपरी येथे विसर्जन महाघाट, मानपाडा, कळवा आणि मुंब्रा यांच्यासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर, अंबरनाथ -बदलापूर अशा १०९ ठिकाणी विधिवत विसर्जनाची सोय केली होती.-------डोंबिवलीत योगाची प्रात्यक्षिकेडोंबिवली येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ६६ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची श्रींच्या विसर्जनाच्या पारंपरिक मिरवणुकीत फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान बाप्पांना निरोप देण्यासाठी सालाबादप्रमाणे नगरवासीय आणि डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या पारंपरिक मिरवणुकीला जेम्स व जॉयना या ब्रिटिश दाम्पत्यानेही हजेरी लावली होती. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग विद्याधाम डोंबिवलीच्या योग पथकाने श्रीकांत देव, छाया लोहिया आणि आर. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० योग साधकांच्या योग पथकाने सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी भाविक मंत्रमुग्ध झाले तसेच साकारलेले मानवी मनोरेही सर्वांना भावले.