मेट्रो प्रकल्पामुळे ठाण्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागेल; एकनाथ शिंदे यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:33 IST2025-09-22T18:31:39+5:302025-09-22T18:33:19+5:30

Eknath Shinde Thane Metro: "फडणवीस मुख्यमंत्री असताना कामाला परवानगी आणि आज त्यांच्याच काळात प्रकल्प पूर्ण ही आनंदाची बाब"

Eknath Shinde confident that Metro project will solve traffic congestion problem in Thane | मेट्रो प्रकल्पामुळे ठाण्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागेल; एकनाथ शिंदे यांना विश्वास

मेट्रो प्रकल्पामुळे ठाण्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागेल; एकनाथ शिंदे यांना विश्वास

Eknath Shinde Thane Metro: मेट्रो मार्ग ४ (वडाळा–कासारवडवली) व ४ अ (कासारवडवली–गायमुख)च्या टप्पा-१ गायमुख जंक्शन गायमुख गाव-घोडबंदर रोड-कासारवडवली-विजय गार्डन या मार्गिकेच्या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत मांडले. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या मेट्रोच्या कामाला परवानगी मिळाली आणि आज त्यांच्याच काळात हा प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याचा विशेष आनंद होतो आहे. ५८ किमी लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प आहे. वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"या प्रक्रियेत कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) यांच्या आवश्यकतेनुसार सर्व तांत्रिक प्रणाली सज्ज आहेत की नाही याचे पुनरावलोकन करण्यात आले. या विभागातील मूलभूत पायाभूत सुविधा उड्डाणपूल (Viaduct), मार्गिका (Track) आणि ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) पूर्ण झाल्या आहेत. तपासणी व प्रारंभिक चाचणी धाव दरम्यान लोड कॅल्क्युलेशनसाठी आणि सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनसाठी आवश्यक माहिती गोळा करणे, तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणालींची जसे की, मेट्रो ट्रेन इत्यादी चाचणी घेऊन त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले," असेही ते म्हणाले.

ठाणे मेट्रो BEMLचे 6-डब्यांचे ट्रेन-सेट्स, जे मेट्रो मार्ग 2 अ व 7 वर चालत आहेत, त्याच पध्दतीच्या आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली, अडथळा (Obstacle) शोध उपकरण, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा, ऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली, ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली (सुमारे 30% बचत) या सुविधा या मेट्रोतही असतील. या प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व चाचणी धावांची सुरुवात करून, एमएमआरडीए ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी मेट्रो मार्ग 4 व 4 अ कार्यान्वित करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलत आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

Web Title: Eknath Shinde confident that Metro project will solve traffic congestion problem in Thane