शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आठ पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार

By admin | Updated: January 17, 2015 23:20 IST

पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला.

पालघर : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सर्वच पक्षांचे उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याचे मनोर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठरविण्यात आले. या निर्णयाची घोषणा पालकमंत्री, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी पत्रकार परिषदेत केली.ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर पालघर व ठाणे जिल्ह्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र,याच दरम्यान पालघर जिल्ह्यातील अनेक शहरे व मोठ्या गावांची नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याचे प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. अशा स्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका होऊन अल्पावधीतच या नगरपंचायती व नगर परिषदांच्या घोषणा झाल्यास जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका निरर्थक ठरतील व मोठा खर्च वाया जाईल, ही भीती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली. १९ जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे व अखेरच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे या बैठकीत ठरले व अपक्षांचीही या संबंधातील सहमती घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीतून माघार घेणार असल्याने २८ जानेवारी रोजी होणारी निवडणूक प्रत्यक्षात होणार नाही, असे आजच्या निर्णयावरून दिसून येते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भातील प्रक्रिया राबविण्याकरिता तालुका पातळीवर अधिकार त्या त्या पक्षाध्यक्षांना देण्यात आले असून अपक्षांची सहमतीही तालुका पातळीवरून मिळविण्याची जबाबदारी संबंधित पक्षाध्यक्षांनी घ्यायचे ठरले. या बैठकीला पालकमंत्री सवरा, खा. चिंतामण वनगा, आ. आनंद ठाकूर, आ. विष्णू घोडा, आ. पास्कल धनारे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनीषा निमकर, माजी खा. बळीराम जाधव, दामू शिंगडा, प्रवीण राऊत, मनीष गणोरे, उत्तम पिंपळे, सुरेश जाधव, विकी शुक्ला इ. मान्यवर पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीला माकप आणि श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित नसले तरी या पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून सर्वपक्षीय निर्णयाला आमची सहमती असल्याचे त्यांनी कळविल्याचे पालकमंत्री सवरा यांनी सांगितले. त्यामुळे अपक्षांच्या भूमिकेकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.