शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील ‘डुरकी’नं पोलीस हैराण

By admin | Updated: September 7, 2016 02:46 IST

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील फोन खणखणला... दोन मोकाट गाई फिरत आहेत त्यांना आवरा.

कल्याण : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील फोन खणखणला... दोन मोकाट गाई फिरत आहेत त्यांना आवरा. त्यांचे काही बरेवाईट झाले तर ऐन उत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल... तेव्हापासून या गाईंचा शोध सुरू झाला... त्यापैकी एक गाय गोशाळेत धाडलीही. मात्र दुसरी काळ््या रंगाची गाय दूरवरून पोलिसांची जीप किंवा पोलीस दिसला तरी सुसाट वेगानं पळ काढते... तिला जेरबंद करण्याकरिता गेली तीन दिवस पोलीस रात्र जागवत असून तिनं त्यांचं घामटं काढल आहे...कल्याण पश्चिम भाग मुस्लिमबहुल आहे. सध्या शहरात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे. राज्यात गोवंश हत्या बंंदी आहे. काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये गोमांस आढळून आल्याने मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ही सगळी पार्श्वभूमी असताना गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील लॅण्डलाईन खणखणली. पलीकडच्या व्यक्तीने आपल्या परिचयासह पोलिसाला सांगितले की, तुमचे पोलीस ठाणे संवेदशील आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरु होत आहे. दोन मोकाट गाई सध्या फिरत असून त्यांचे काही बरे-वाईट झाले तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. उत्सवाला गालबोट लागू शकते. त्यामुळे त्या गाईंचे काय करायचे ते तुम्ही बघा. या फोनमुळे बाजारपेठ पोलिसांची झोपच उडाली. फोनची हकीकत वरिष्ठांच्या कानी गेल्यावर त्यांनीही गाईंना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिसांनी गाईंचा तपास करण्याकरिता परिसर पिंजून काढला. त्यापैकी एक गाय पोलिसांच्या हाती लागली. तिला पकडून पोलिसांनी गोशाळेत धाडले. दुसरी गाय ही काळ््या रंगाची आहे. मात्र ती पोलिसांची डाळ शिजू देत नाही. गाईचा दिवसा पाठलाग सुरू केला तर लोकांमध्ये पोलीस हा चेष्टेचा विषय होईल या भीतीने रात्रीच्या वेळी पोलीस या गाईचा पाठलाग करतात. पोलिसांची गाडी दूरवर दिसली तरी ही गाय पळ काढते. दोन रात्री हाच अनुभव आल्यावर आता ही काळी गाय दिवसभर कुठे असते, कुठे बसते, या तिच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी एक पोलीस तिच्या मागे मागे फिरत आहे. दिवसाही पोलिसांची गाडी दिसली तरी ही गाय पळून दुर्गाडी परिसरात जाऊन बसते. गाय पकडण्यासाठी पोलिसांकडे यंत्रणा नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे अशी काही यंत्रणा असल्यास त्यांनी ती उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. (प्रतिनिधी)