शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली-पुणे एसटी सोमवारपासून

By admin | Updated: May 13, 2017 00:54 IST

डोंबिवली-पुणे एसटी बससेवा सोमवारपासून सुरू करण्याची मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ठाणे कार्यालयाने मान्य केली आहे

डोंबिवली : डोंबिवली-पुणे एसटी बससेवा सोमवारपासून सुरू करण्याची मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ठाणे कार्यालयाने मान्य केली आहे. प्रवाशांकडून या बसची मागणी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ‘आॅन दी स्पॉट’ या सदराच्या माध्यमातून ८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. मनसेने ही मागणी उचलून धरत शुक्रवारी एसटीचे जिल्हा नियंत्रक अविनाश पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी मान्य केली.डोंबिवली एसटी बसस्थानकाची दुरवस्था दूर करा आणि डोंबिवली-पुणे बस सोडा, अशा प्रवाशांच्या मागण्या आहेत. खाजगी बस व कूलकॅबला डोंबिवली-पुणे प्रवासी मिळतात. मग, एसटीकडून डोंबिवली-पुणे बस का चालवली जात नाही? खाजगी बस कंपन्यांकडून हप्ते घेत असल्याचा आरोपही मनसेने केला होता. मनसे पाठोपाठ शिवसेनेने मंगळवारी डोंबिवली बसस्थानकाची पाहणी केली. मनसेने शुक्रवारी जिल्हा नियंत्रक पाटील यांची विठ्ठलवाडी बस डेपोत भेट घेतली. या वेळी कदम व घरत, माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, सागर जेधे आदी उपस्थित होते. डोंबिवली-पुणे बस का सुरू केली जात नाही, असा सवाल मनसेने पाटील यांच्याकडे केला. त्यावेळी पाटील यांनी कल्याण-आळेफाटा-नगर या बस दर १५ मिनिटांनी कल्याण बस डेपोतून सुटतात. आळेफाटामार्गे पुण्याला जाता येते. त्यावर, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी इतका द्राविडी प्राणायाम प्रवाशांनी का करावा? डोंबिवली-पुणे बस चालवण्यास काय अडचण आहे, असा सवाल केला.